२९ देशांमध्ये बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्रात १० पटीने वाढ!


लंडन/ नवी दिल्ली: करोना महासाथीपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेकजणांकडून प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसऱ्या बाजूला करोना महासाथीचा फायदा उठवत अनेकांकडून मोठ्या प्रमाणावर चुकीच्या मार्गाने कमाई केली जात आहे. करोना लसीकरणाचे प्रमाणपत्र अनेक देशांमध्ये सक्तीचे करण्यात आले आहे. त्यातून अनेकांनी आता बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे.

करोना लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती जवळपास सर्वच देशांमध्ये केली जात आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास, सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येते. मागील काही महिन्यात बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्राचे प्रमाण १० पटीने वाढले असल्याचा दावा करण्यात आला आहे. करोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांची जोरदार कमाई सुरू आहे.

करोनाचा जोर ओसरला! जगभरातील बाधितांच्या संख्येत घट
एक सॉफ्टवेअर कंपनी चेक पॉईंटने बनावट लस प्रमाणपत्रावर एक संशोधन अभ्यास केला. त्यातून ही बाब समोर आली. जवळपास २९ देशांमध्ये बनावट लसीकरण प्रमाणपत्राचे प्रमाण १० पटीने वाढले असून यामध्ये भारताचाही समावेश आहे. टेलिग्रामवर जवळपास ७५ डॉलरमध्ये हे बनावट प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जातात. भारतासह ऑस्ट्रिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, माल्टा, पोर्तुगाल, सिंगापूर, थायलँड, संयुक्त अरब अमिरात आदी देशांचा समावेश आहे.

अमेरिकेत करोना बळींची संख्या वाढली; बायडन प्रशासन चिंतेत
चेक पॉईंट रिसर्चच्या (सीपीआर) तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर १० ऑगस्ट रोजी बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्राचे जवळपास एक हजार विक्रेते होते. त्यानंतरच्या काही दिवसांत ही संख्या वाढून १० हजार इतकी झाली आहे.

टेलिग्रामवर बनावट लस प्रमाणपत्रांची विक्री करणाऱ्या ग्रुपची संख्या ३० हजाराच्या घरात होती. त्यानंतर या संख्येत मोठी वाढ झाली.

‘डार्कनेट’वर डिसेंबर २०२० कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र २५० डॉलर इतक्या रक्कमेला विक्री करण्यात येत होते. आता १३० ते १५० डॉलरमध्ये विक्री करण्यात येत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: