वार्षिक १२ टक्क्यांपर्यंत परतावा;’या’ कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित अपरिवर्तनीय रोखे खुले


हायलाइट्स:

  • सुरक्षित रोख्यांची मुदत ३६६ दिवस ते ५४ महिने आणि असुरक्षित रोख्यांची मुदत ६१ ते ७१ महिन्यांदरम्यान
  • सर्व प्रकारच्या रोख्यांसाठी किमान गुंतवणूक रक्कम १०,००० रुपये
  • रोखे विक्री २३ सप्टेंबर २०२१ रोजी खुली होईल आणि १८ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद होईल

मुंबई : इंडेल मनी लिमिटेड या सोने तारण कर्ज क्षेत्रातील ठेवी न स्वीकारणाऱ्या आणि महत्त्वाच्या बँकेतर वित्तीय कंपनीने (“एनबीएफसी”), प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेले सुरक्षित आणि असुरक्षित अपरिवर्तनीय रोखे अर्थात एनसीडीची सार्वजनिक विक्रीची घोषणा केली आहे. ही रोखे विक्री २३ सप्टेंबर २०२१ रोजी खुली होईल आणि १८ ऑक्टोबर २०२१ रोजी (लवकर भरणा पूर्ण झाल्यास मुदतीआधीच लवकर बंद करण्याच्या पर्यायासह) बंद होईल.व्याजाचा दर (कूपन रेट) प्रति वर्ष १२.०० टक्क्यांपर्यंत असेल.

सोने- चांदीवर दबाव कायम ; आज पुन्हा दोन्ही धातूंच्या किमतीत झाली घसरण
आमची व्यावसायिक रणनीती आमच्या स्पर्धात्मक शक्तींचे भांडवल करण्यासाठी आणि सोने तारण कर्ज उद्योगात आमचे स्थान बळकट करून विस्तारण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जोखीम व्यवस्थापनासंबंधाने आमचे काटेकोर धोरण आणि सानुकूल विकसित पतपुरवठाविषयक प्रक्रिया आम्हाला आमच्या गोल्ड लोन फायनान्सिंग व्यवसायाच्या विस्ताराची मुभा देईल. या एनसीडीमार्फत येणारा निधी आमच्या उसनवारीचे संमिश्र रूप वाढविण्यास मदत करेल, असे मत इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उमेश मोहनन म्हणाले,
प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेले हे सुरक्षित आणि असुरक्षित अपरिवर्तनीय रोखे अर्थात एनसीडी आहेत.

तब्बल ९ वर्षांनंतर टाटा समूहाला मिळाले ‘हे’ कंत्राट; रतन टाटा म्हणाले…
मूळ ७५ कोटी रुपये रकमेपर्यंत निधी उभारणे अपेक्षित असलेल्या या रोखे विक्रीत, अतिरिक्त ७५ कोटी रुपयांचा भरणा झाल्यास एकूण १५० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याचा पर्याय खुला आहे. या रोखे विक्रीचे मुख्य व्यवस्थापन विवरो फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून पाहिले जात आहे.

सोने- चांदीवर दबाव कायम ; आज पुन्हा दोन्ही धातूंच्या किमतीत झाली घसरण
या रोखे विक्रीद्वारे गोळा केलेला निधी पुढे कर्ज वितरण, वित्तपुरवठा करण्यासाठी आणि कंपनीने उचललेल्या कर्जावरील व्याज, मुद्दलाची परतफेड करण्यासाठी (किमान ७५%) आणि सामान्य उद्यम प्रशासनासाठी *(जास्तीत जास्त २५%पर्यंत) या उद्देशाने वापरला जाईल. * रोखे विक्रीतून येणाऱ्या निव्वळ प्राप्तिचा प्रथम वर नमूद केलेल्या कारणांसाठी वापर करण्यात येईल. ‘सेबी एनसीएस नियमां’च्या अनुपालनानुसार, इतर सामान्य उद्यम प्रशासनासाठी निधी वापरण्याचा प्रस्ताव असला तरी तो एकूण प्राप्त निधीच्या २५% पेक्षा जास्त नसावाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: