‘या’ आघाडीत भारताचा समावेश करण्यास अमेरिकेचा नकार


वॉशिंग्टन: हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या विस्तारवादी रणनीतीला वेसण घालण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘ऑकस’ या त्रिराष्ट्रीय संरक्षणात्मक भागीदारी गटामध्ये अन्य कोणत्याही देशाला स्थान मिळणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘क्वाड’प्रमाणेच भारत व जपान हे देशही या गटामध्ये सहभागी होण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी १५ सप्टेंबरला ‘ऑकस’ या गटाची घोषणा केली. याद्वारे ऑस्ट्रेलियास प्रथमच अण्वस्त्रवाहू पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी अमेरिका व ब्रिटनकडून तंत्रज्ञान मिळणार आहे. चीनने या गटास तीव्र विरोध करीत, यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिरतेला धक्का लागून शस्त्रस्पर्धा वाढीस लागेल, असा आक्षेप घेतला. तर ऑस्ट्रेलियाने अण्वस्त्रवाहू पाणबुडीचे कंत्राट रद्द केल्याने फ्रान्सनेही याविरुद्ध राजनैतिक स्तरावर निषेध नोंदवला. यासोबतच या नव्या त्रिराष्ट्रीय गटामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व भारताचा समावेश असलेला ‘क्वाड‘ हा गट निष्प्रभ ठरण्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘ऑकस‘मध्येही भारत व जपानचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होत होती. त्यावर अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

PM मोदी-कमला हॅरिस भेट; नेटकऱ्यांमध्ये हॅरिस यांच्या ट्विटची चर्चा !
व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जेन प्साकी म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात झालेली ऑकस गटाची घोषणा ही केवळ प्रतिकात्मक नाही. हाच संदेश अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यापर्यंतही पोहोचवला आहे.‘ आज, शुक्रवारपासून अमेरिकेत सुरू होणाऱ्या क्वाड गटाच्या परिषदेसाठी भारत व जपानचेही राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

चीनला पॅसिफिक महासागरात रोखणार!; तीन देशांनी स्थापन केला ‘ऑकस’

ऑस्ट्रेलिया-अमेरिकेकडून धोका; मॅक्रॉन यांची PM मोदींसोबत चर्चा

‘ऑकस‘ गटातील ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारत व जपानसोबतही अमेरिका लष्करी सहकार्याची सुरुवात करील काय, या एका पत्रकाराच्या प्रश्नावर प्साकी यांनी, ‘आज ‘ऑकस‘ आणि नंतर ‘जयकस‘ (जपान व भारताचा समावेश असलेला गट)?‘, असा मिश्किल प्रश्न करीत, भारत व जपानच्या सहभागाची शक्यता फेटाळून लावली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: