भाजप नगरसेवकाच्या मनस्तापामुळे रहिवाशाची आत्महत्या; दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने पदाचा गैरवापर करीत महानगरपालिकेचा फौजफाटा आणून एका इमारतीवरील मोबाईल टॉवर काढून टाकला. त्यानंतर घर पाडण्याच्या धमकी दिल्यामुळे मानसिक त्रासातून एका रहिवाशाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दत्तवाडीतील महादेव इमारतीत घडली. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक आनंद रिठे (रा. साई मंदीराजवळ, दत्तवाडी)यांच्याविरूद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय महादेव सुर्वे (वय 53) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शशांक सुर्वे यांनी तक्रा दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे यांनी स्वतःच्या इमारतीवर एका मोबाईल कंपनीचा टॉवर बसविला होता. त्याबदल्यात नगरसेवक आनंद रिठे यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले होते. मात्र, सुर्वे यांनी पैसे न दिल्यामुळे रिठे यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करीत महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेत 10 जूनला टॉवर काढून टाकला. त्यानंतर राहते घरही पाडून टाकण्याची धमकी रिठे यांनी दिली होती. त्यामुळे सुर्वे यांनी मानसिक ताणातून 21 जूनला गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आनंद रिठे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी दिली आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: