वायू प्रदूषणाचे नियम कडक; WHO ने घेतला ‘हा’ निर्णयजीनिव्हा : मानवी आरोग्याला हवाई प्रदूषणाचा सर्वांत मोठा धोका असल्याचे सांगून, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी हवेच्या दर्जासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे अधिक कडक केली आहेत. हवा प्रदूषणामुळे जगभरात वर्षाला ७० लाख मृत्यू होत आहेत. हवा प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.

हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर आधीच्या समजापेक्षा वेगळे परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. केवळ काही देशांतच नव्हे, तर जागतिक पातळीवर हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी करण्याची आ‌वश्यकता आहे, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ग्लासगो येथे ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान जागतिक हवामान परिषद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले आहे. हवामान बदलाबरोबरच हवा प्रदूषणाचादेखील पर्यावरणासह मानवी आरोग्याला मोठा धोका असल्याचे संघटनेने म्हटले आहे. हवा प्रदूषण कमी झाले, तर हवामान बदलाचे परिणामही कमी होण्यास मदत होणार असून, तसा अहवाल ‘डब्ल्यूएचओ’ ग्लासगो येथे सादर करणार असल्याचे संघटनेच्या हवामान विभागाच्या प्रमुख मारिया नीरा यांनी सांगितले आहे.

प्रदूषित घटकांची नवी पातळी
‘‘डब्ल्यूएचओ’ने हवेच्या दर्जासंबंधी जवळपास सर्व प्रदूषक घटकांची पातळी कमी केली आहे. प्रदूषित घटकांनी नव्याने आखलेल्या पातळीला ओलांडले, तर आरोग्याला अधिक धोका पोहोचणार आहे. या पातळीची मर्यादा पाळली, तर लक्षावधी लोकांचा जीव वाचेल,’ असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हवा प्रदूषणाच्या घातक परिणामांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांनी २००५मध्ये हवेच्या दर्जासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ग्लासगो येथे ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान जागतिक हवामान परिषद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय सांगितले?

ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड यांच्यासह सहा प्रदूषक घटकांची हवा प्रदूषण करण्याची पातळी खाली आणली आहे. पीएम १०, पीएम २.५ ‘पर्टिक्युलेट मॅटर’चा (१० ते अडीच मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाच्या आकाराचे) या घटकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीएम २.५ घटकचा रक्तप्रवाहातही मिसळू शकतात. या घटकांची पातळी निम्म्याने कमी केली आहे.

‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयेसस म्हणाले…

वर्ष २०१९मध्ये जगातील ९० टक्के लोकसंख्या पीएम २.५ घटकांची पातळी अधिक असणाऱ्या क्षेत्रामध्ये राहत होती. जगभरातील जवळपास प्रत्येक जण प्रदूषित हवेचा सामना करीत आहे. न्यूमोनिया, अस्थमा आणि कोव्हिड-१९सारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. उच्च उत्पन्न गटातील देशांमध्ये १९९०पासून हवेचा दर्जा चांगला. मात्र, त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. हवा प्रदूषणामुळे सत्तर लाख जणांचा दरवर्षी मृत्यू होतो.

कशाची पातळी केली कमी?

पीएम २.५ प्रदूषकांची पातळी क्युबिक मीटरला १० मायक्रोग्रॅमवरून पाच मायक्रोग्रॅमवर करण्यात आली. नायट्रोजन डायऑक्साइडसारख्या वायूंची पातळी क्युबिक मीटरला ४०वरून आता दहा मायक्रोग्रॅमवर आणण्यात आली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: