Delhi Firing: न्यायालय परिसरातच कुख्यात गँगस्टर जितेंद्र योगीवर गोळीबार, तिघांचा मृत्यू


हायलाइट्स:

  • दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट परिसरातील घटना
  • दिवसाढवळ्या न्यायालय परिसरात गोळीबाराची घटना
  • वकिलाच्या पोशाखात मारेकरी न्यायालय परिसरात दाखल झाले होते

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीला हादरवून टाकणारी एक घटना आज घडलीय. रोहिणी न्यायालय परिसरातच दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर जितेंद्र गोगी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. गोगी आज सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर झाला होता. मारेकऱ्यांवर प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पोलिसांनी त्यांना जागेवरच ठार केलं. या गोळीबारात आणखीन तीन – चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

ठरलं! भाजप-निषाद पक्ष यूपी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार
Narendra Giri Death: महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रं सीबीआयच्या हाती

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात टिल्लू गँगच्या दोन गुंडाना ठार करण्यात आलंय. हे दोघे वकिलांचा काळा कोट परिधान करून रोहिणी न्यायालय परिसरात दाखल झाले होते. त्यांनी जितेंद्र गोगी याच्यावर गोळीबार केला.

या दोन्ही गुंडांविषयी अधिक तपासणी पोलीस करत आहेत. गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये जुनं शत्रुत्व होतं. त्यातूनच हा गोळीबार करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

मात्र, ही घटना देशाच्या राजधानीतील कायदे – सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी पुरेशी ठरतेय.

वाचा : आसाम हिंसाचार : पोलिसांना नागरिकांवर थेट गोळीबाराचे आदेश कुणी दिले?

धक्कादायक! खरं सांग… असं विचारत तिने मुलीचा हात उकळत्या तेलात बुडवलाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: