Coronavirus UK ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचा हाहा:कार; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा


लंडन: जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचे थैमान सुरूच आहे. जगात पहिल्यांदा लसीकरण मोहीम सुरू करणाऱ्या ब्रिटनमध्ये करोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे हाहा:कार उडाला आहे. ब्रिटनच्या लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटमुळे तिसरी लाट आली असल्याचा इशारा दिला आहे. डेल्टा वेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ब्रिटनमधील तिसऱ्या लाटेमुळे भारतातही तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे म्हटले जात आहे.

लसीकरण आणि प्रतिरक्षण संयुक्त समितीचे (जेसीव्हीआय) सल्लागार असलेले प्रा. एडम फिन यांनी ‘बीबीसी’ ला सांगितले की, देशात लस आणि कोविड-१९च्या डेल्टा वेरिएंट दरम्यान एकप्रकारेच स्पर्धाच सुरू आहे. प्रा. फिन यांनी सांगितले की, डेल्टा वेरिएंट वेगाने फैलावत आहे. त्यापैकी काहीजण संसर्ग वेगाने होत नसल्याबद्दल आशावादी असू शकतात. मात्र, संसर्ग वेगाने होत असून ही सत्य परिस्थिती आहे असे त्यांनी सांगितले.

वाचा: करोना लशीमुळे प्रजनन क्षमतेत घट?; संशोधक म्हणतात की…

वयस्करांना वाचवण्यासाठी लसीकरणावर जोर

त्यांनी म्हटले की, लसीकरण मोहीम विशेषत: वृद्धांना लशीचा दुसरा डोस देण्यासाठीची मोहीम आणि डेल्टा वेरिएंटची लाट यांच्यात वरचढ होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक वृद्धांना, वयस्करांना लशीचा दुसरा डोस दिल्यास तेवढ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या आटोक्यात येऊ शकते.

वाचा: भारतात करोनाचे थैमान: ‘लँसेंट’ च्या तज्ज्ञांनी भारताला केल्या ‘या’ आठ सूचना

वाचा: चिंता वाढली! डेल्टानंतर आता ‘या’ नव्या वेरिएंटचा धोका; २९ देशांमध्ये फैलाव

डेल्टा वेरिएंटचे थैमान

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे. ब्रिटनमधील ५४० करोनाबाधितांपैकी किमान एकाला डेल्टा वेरिएंटची बाधा झाली आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या माहितीनुसार, लसीकरणामुळे संसर्गाची बाधा होण्याची शक्यता कमी होते. करोना लशीचा एक डोस घेतल्यास करोनाची लागण होण्याची शक्यता ७५ टक्क्यांनी कमी होते. तर, लशीचे दोन्ही डोस घेतल्यास ९० टक्क्यांपर्यंत शक्यता कमी होते.

Coronavirus updates करोना लढाईत ब्रिटन बॅकफूटवर; ‘डेल्टा’मुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्के वाढ
भारतात सहा ते आठवड्यात तिसरी लाट?

कोविड प्रोटोकॉलचे पालन न केल्यास आगामी सहा ते आठ आठवड्यांदरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले. व्यापक प्रमाणावर लसीकरण होईपर्यंत लोकांनी नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: