लघु आणि मध्यम उद्योजक घेणार थेट विमा; ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चे नवे व्यासपीठ


हायलाइट्स:

  • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने लघु उद्योजकांसाठी सुरु केला मंच
  • एसएमई क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकांना स्वतः च्या कंपनीसाठी विमा पॉलिसी घेता येईल
  • एसएमईसाठीचे हे संकेतस्थळ तत्काळ विमा पॉलिसीचे वितरण करते आणि ही १०० टक्के कागदविरहीत प्रक्रिया आहे.

मुंबई : खासगी क्षेत्रात बिगर आरोग्यविमा कंपन्यांत आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने डिसेंबर २०२० मध्ये लघु आणि मध्यम क्षमतेच्या कंपन्यांसाठी (एसएमई) – www.sme.icicilombard.com हा ऑनलाईन व्यापार विमा मंच सुरु केलेला आहे. एसएमई क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकांना स्वतः च्या कंपनीसाठी विमा पॉलिसी उतरविणे, पॉलिसीचे फेरनुतनीकरण करणे, विमा पॉलिसींना मान्यता देणे आणि दावा नोंदविण्यासाठी हा नवीन संवादी स्वरुपातील मंच अतिशय उपयुक्त राहणार आहे.

पाच लाखांपासून दोन कोटींपर्यंत कर्ज;टाटा कॅपिटलची ‘लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड्स’ सुविधा
कंपनीच्या या संकेतस्थळावर विविध प्रकारच्या विमा पॉलिसींची श्रेणी उपलब्ध असून त्या एमएसएमई, स्टार्टअप्स आणि वैयक्तिक कंपनी मालकांसाठी विविध प्रकारच्या व्यावसायिक जोखीम उपायांची पुर्तता करते. केवळ एका बटणाच्या क्लिकआधारे कोणत्याही विनाअडथळा विमा पॉलिसी ऑनलाईन घेता येऊ शकतात. एसएमईसाठीचे हे संकेतस्थळ तत्काळ विमा पॉलिसीचे वितरण करते आणि ही १०० टक्के कागदविरहीत प्रक्रिया आहे. विमा मान्यता, फेरनुतनीकरण आणि दाव्यांबाबत पुर्वसुचनेसह व्यापाऱ्यांसाठी विमाकवच, दुकानदारांसाठी पॉलिसी, सार्वजनिक उत्तरदायित्व कायदा, औद्योगिक आणि बिगर औद्योगिक, बांधकाम क्षेत्रातील सर्व जोखीमा, अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व जोखीमा, कंत्राटदाराचे प्रकल्प आणि यंत्रासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड आणखी नवीन योजना या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणणार आहे.

शेअर बाजारात दिवाळी! सेन्सेक्स प्रथमच ६० हजारांवर, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई
एसएमई उद्योजक हे भारताच्या विकासाच्या इंजिनाचा प्रमुख कणा आहे. उद्योगाचा छोटा आकार आणि अतिशय स्पर्धात्मक वातावरणात वाटचाल याचा विचार करता या क्षेत्रासाठी कार्यक्षम अशी जोखीम व्यवस्थापन पध्दती आणणे गरजेचे आहे. कोवीड-१९ सारख्या घटनांमुळे त्यांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. या नवीन मंचामुळे छोटे उद्योजक अवघ्या एका क्लिकच्या सहाय्याने विम्याशी संबंधित विविध पर्यायांचा लाभ घेऊ शकतात आणि व्यावसायिक वाटचालीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या जोखीमेपासून पुरेसे विमा संरक्षण त्यांना याद्वारे मिळण्याची खात्री आहे.

अमेरिकेच्या नॅसडॅकवर बंपर नोंदणी; ‘या’ उद्योजकाने ५०० भारतीय कर्मचाऱ्यांना क्षणात करोडपती बनवले
आयसीआयसीआय लोम्बार्डच्या व्यावसायिक विमा पोर्टफोलिओमध्ये मालमत्तेची हानी, मालाची वाहतूक, कायदेशीर देणी, सायबर सुरक्षा, विविध क्षेत्रात कामगारांशी संबंधित जोखीमा इत्यादींसह विविध प्रकारचे विमा कवच उपाय समाविष्ट आहेत. याच्याच जोडीला कंपनी ग्राहकांच्या सेवेसाठी रोबोटिक्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, द इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

नवीन मंचाच्या यशाबद्दल बोलताना आयसीआसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले की, निर्भय वादे या आमच्या ब्रॅण्डच्या नितीला अनुसरुन विविध प्रकारच्या ग्राहकांना ग्राहककेंद्रीत उपाय सादर करण्यावर आयसीआसीआय लोम्बार्डचे सदैव लक्ष केंद्रीत झालेले आहे. देशात इंटरनेटचा वाढत चाललेला वापर आणि परिणामी डिजीटलचा स्वीकार करण्यातील वाढीचा फायदा घेत आयसीआसीआय लोम्बार्ड आपल्या मंचाच्या माध्यमातून भारतातील एमएसएमई क्षेत्रातील सहा कोटी ३३ लाख उद्योगांपर्यंत पोहचत त्यांचा व्यवसाय सुरक्षित करण्यास हातभार लावत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: