PM मोदींनी केले जपानच्या पंतप्रधानांचे कौतुक; डिजीटल पेमेंट, ५-जी वरही चर्चा


वॉशिंग्टन: अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारत-जपान दरम्यान द्विपक्षीय चर्चादेखील झाली. या द्विपक्षीय चर्चेत डिजीटल अर्थव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबत पहिली भेट आहे. याआधी दोन्ही पंतप्रधानांमध्ये एकदा दूरध्वनीवरून चर्चा झाली होती.

या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचे कौतुक केले. करोना काळात टोकियो ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सुगा यांचे अभिनंदन केले. कठिण काळात ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करणे हे कौतुकास्पद होते, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. त्याशिवाय या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तानच्या मुद्यांवरही चर्चाही केली.

PM मोदी आणि कमला हॅरिस यांची भेट ; करोना, लोकशाहीसह ‘या’ मुद्यांवर चर्चा
भारत-जपान दरम्यान द्विपक्षीय चर्चेत ५-जी तंत्रज्ञानावरही चर्चा झाली. सध्या भारतात ५-जी सुरू करण्याबाबत जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतात सुरू असलेल्या प्रयत्नांना जपानकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पाठिंबा मिळाल्यास ५-जी तंत्रज्ञान लवकर उपलब्ध होऊ शकेल. त्याशिवाय, ईशान्य भारताच्या विकासाच्या अनुषंगाने काही योजनांवर जपानकडून काम केले जात आहे. या बैठकीत या मुद्यांवरही चर्चा झाली.

pm modi us visit : अमेरिकेतील ५ बड्या कंपन्यांच्या सीईओंना PM मोदी भेटले, काय झाली चर्चा? वाचा…
अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या गटांचा सहभाग असलेल्या ‘क्वाड’ गटाची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचे पंतप्रधान अमेरिकेत दाखल झाले आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: