पवनचक्कीला अचानक लागली भीषण आग; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण


हायलाइट्स:

  • गमेशा कंपनीच्या पवनचक्कीला आग लागली
  • परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
  • वाऱ्यामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले

सांगली : जत तालुक्यातील खोजनवाडी येथे गमेशा कंपनीच्या पवनचक्कीला आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. उभ्या पवनचक्कीला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पवनचक्कीत झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीमुळे कंपनीचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गमेशा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

balasaheb thorat: मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरून चर्चा; बाळासाहेब थोरात म्हणाले…

याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील खोजनवाडी परिसरात गमेशा कंपनीच्या पवनचक्की आहेत. यातील काही पवनचक्की गेल्या आठवड्यापासून बंद आहेत. बंद असलेल्या पवनचक्की दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी दुपारी आले होते. परंतु अचानक पवनचक्कीच्या मुख्य मशीनमधून धुराचे लोट दिसू लागले. प्रसंगावधान राखून कर्मचारी बाजूला पळाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, उंचावरील वाऱ्यामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी धुराचे लोट वाऱ्याच्या वेगासोबत दूरवर पसरले होते. याबाबत कंपनीच्या वतीने उशीरा जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: