Kiss in Bus : फिल्मी स्टाइलमध्ये ‘त्याने’ बसमधील विद्यार्थीनीला केला किस; आता आला ट्विस्ट


बेंगळुरूः कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये मोठी धक्कादाय ( youth attempts filmy style kiss in bus girl ) घटना घडली. बसमधून उतरण्यापूर्वी एका मुलाने कॉलेमधील विद्यार्थीनीला फिल्मी स्टाइलमध्ये किस केला. पण हे अश्लील कृत्य त्याला आता महागात पडलं आहे. त्याच्याविरोधात कर्नाटक पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस त्या मुलाचा शोध घेत आहेत.

ही घटना १३ सप्टेंबरला घडली. विनायक चतुर्थीनंतर पीडित विद्यार्थीनीही कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसने बेल्लारीहून बेंगळुरूला परतत होती. यावेळी एक मुलगा आपल्या शेजारच्या बसमध्ये बसला होता, असं तिने आरोप केला आहे.

पीडित मुलगी भानावर येण्यापूर्वीच तो पळाला

तो ‘गीता गोविंद’ नावाचा एक तेलुगू चित्रपट बघत होता. यात एका सीनमध्ये हिरो, अभिनेत्रीला ती झोपेत असताना किस करतो. प्रवासात आपल्याला डुलकी लागली, तेव्हा त्याने हाच सीन वास्तवात घडवण्याचा प्रयत्न केला. किस करण्यापूर्वी तो आपल्याकडे विचित्र नजरेने बघत होता, असं पीडित मुलीने म्हटलं.

पीन्या-जलहाली येथे प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबली. त्यावेळी मुलाने पीडित मुलीच्या गालावर किस केला आणि तो बसमधून उतरला. मुलीला काही कळण्यापूर्वी तो मुलगा बसमधून उतरून गायब झालाय. त्याने फिल्मी स्टाइलमध्ये घेतलेल्या किसवरून पीडित मुलगी प्रचंड संतापली.

gas agency incharge arrested : पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती, गॅस एजन्सी चालकाला अटक

पोलिस CCTV फुटेजची मदत

पीडित मुलगी ही आर्किटेक्चरची विद्यार्थी आहे. तिने मुलाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

telangana police : बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू? हैदराबाद पोलिसांना सोशल मीडियातून ‘सॅल्यूट’

आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ह फुटेज पोलिस तपासत आहेत. त्याला पकडण्यासाठी बस चालक, वाहक आणि इतर प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनेनंतर मुलगी घरी गेली. यानंतर तिने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. आता बगलागुंते पोलिस तपास करत आहेत.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: