बाळाला भेटण्यासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडलाम. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरात घरफोड्या व वाहनचोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी नवजात मुलीला भेटण्यास आल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे व वाहनचोरीचे १२ गुन्हे उघडकीस आणत १२ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जयसिंग उर्फ पिल्लूसिंग कालुसिंग जुनी (वय २८, रा. वैदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोथरूड परिसरात सोसायटीत शिरून घरफोडी केली होती. त्यावेळी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी जुनी हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला होता. त्याच्या अटक केलेल्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) नुसार कारवाई केली होती. जुनी याच्यावर मकोकाची कारवाई केली होती. त्याचा स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू होता.

वाचाः
जयसिंग जुनी याला नुकतीच मुलगी झाली आहे. तिला भेटण्यासाठी जुनी हा येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा रचला. जुनी हा पहाटेच्या वेळी मुलीला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला पकडले. त्यावेळी त्याने स्वतः ला मारून घेण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला पकडून त्याचा प्रयत्न हाणून पाडला. जुनी याच्याकडे कौशल्याने तपास केला असता पाप्पासिंग दुधानी याच्यासोबत शहरात विविध भागात रेकी करून घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यानुसार त्याच्याकडून आठ घरफोडीचे व हडपसर, स्वारगेट, मार्केटयार्ड, सासवड येथील वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहे.

वाचाःSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: