‘याचा अर्थ काही तरी गडबड आहे’, मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर भाजप नेत्याची शंका


हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांचा आज औरंगाबाद दौरा
  • मुख्यमंत्र्यांच्या विधानावरुन चर्चांना उधाण
  • भाजप नेत्यानं व्यक्त केली शंका

अहमदनगरः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant patil) आणि त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोघांची वक्तव्य त्या त्या संदर्भाने असली तरी त्यांचा एकत्रित अर्थ लावला जाऊ लागला असून भाजपच्या नेत्यांनी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील असा आशावाद व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे (Ram shinde) यांनीही यावर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे सरकारमध्ये काही तरी गडबड असल्याचे संकेत आहेत. तसे असेल तर जनतेच्या मनातील सक्षम पर्याय देण्यास आम्ही तयार आहोत,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.

वाचाः मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरुन युतीचे संकेत?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी प्रा. शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या विषयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की ‘मला माजी मंत्री म्हणू नका. यावरून त्यांनी लवकरच आजी मंत्री होण्याचा सूचक इशारा दिला आहे. त्याला पुष्टी देणारे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलल्याने त्याला महत्व आहे. एकूणच हे सकार स्थापन झाल्यापासून ते केव्हाही पडेल, अशी जनतेच्या मनात शंका आहे. याला पुष्टी देणारी वक्तव्य आणि घटना आघाडीतील नेत्यांकडूनच घडत आहेत. याचा अर्थ काही तरी गडबड सुरू आहे. याचा एवढचा अर्थ काढता येईल. त्यानंतर राज्यातील जनतेला जे अपेक्षित आहे, ते देण्याचे काम भाजप करील.’ असेही शिंदे म्हणाले.

वाचाः मुख्यमंत्र्यांसमोरच रावसाहेब दानवेंची टोलेबाजी; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी भाषण करताना ‘व्यासपीठावर बसलेल्या माझ्या आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर माझे भावी सहकारी’ अशा शब्दात सुरुवात केली. त्यावेळी व्यासपीठावर अन्य पक्षांच्या नेत्यांसोबत भाजपचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वाचाः
मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाचला योजनांचा पाढा; विरोधकांना लगावला टोलाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: