आमचं मोठं नुकसान केलं; पाकिस्तानवर मित्र देश चीन नाराज


बीजिंग: पाकिस्तानचा जवळचा मित्र देश चीन त्यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) प्रकल्पात चीनने अब्जावधी गुंतवले आहेत. मात्र, या प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने चिनी कंपन्या हताश झाल्या आहेत. पाकिस्तानच्या सिनेटच्या समितीनेदेखील या प्रकल्पावर मागील तीन वर्षात काहीही प्रगती न झाल्याने चिंता व्यक्त केली. चीन सीपीईसी प्रकल्पाच्या कामावर नाराज असल्याचे या समितीचे अध्यक्ष सलीम मांडवीवाला यांनी म्हटले. चिनी राजदूतांनीदेखील याबाबत तक्रार केली असल्याचे त्यांनी म्हटले.

सीपीईसी प्राधिकरणाचे मुख्य असिम सलीम बाजवा यांनी ६० अब्ज डॉलर्सच्या सीपीईसी प्रकल्पाला पाकिस्तानची जीवनवाहिनी म्हटले होते. त्याशिवाय हा प्रकल्प पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे विकसित देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश होईल असे म्हटले होते.

चीनच्या कुरापती सुरूच!; दौलत बेग ओल्डी हवाई तळाजवळ तयार केला महामार्ग
चिनी कंपन्या नाराज

सीपीईसी प्रकरणावर पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक मन्सूर यांनी देखील मांडवीवाला यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. चिनी कंपन्या सरकारी संस्थाने आणि त्यांच्या कामावर खूष नाहीत. ग्वादर विमानतळाच्या कामाच्या प्रगतीवरही चीनने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सीपीईसीचे काम प्रगतीपथावर येईल असे आश्वासन त्यांनी सिनेटच्या समितीला दिले.

चीनला पॅसिफिक महासागरात रोखणार!; तीन देशांनी स्थापन केला ‘ऑकस’
पाकिस्तानमध्ये सीपाईसी व अन्य प्रकल्पांवर जवळपास १३५ चिनी कंपन्या काम करत आहेत. सीपीईसी प्रकल्पाशी संबंधित असलेल्या १५.७ अब्ज डॉलर्सचे २१ प्रकल्प कामे पूर्ण झाली आहेत. यामधील १० कामे ही ५३२० मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि HVDC पारेषणशी संबंधित प्रकल्प आहेत. यामध्ये ९.६ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: