गुंतवणूक ; म्युच्युअल फंडांच्या ‘एमएनसी’ फंडांमध्ये गुंतवणुकीचे फायदे


हायलाइट्स:

  • एमएनसी कंपन्या स्थानिक बाजारांसाठी जागतिक उत्पादने आणि सेवा पुरवतात.
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा एमएनसी फंड हा एक चांगला पर्याय आहे.
  • एमएनसी कंपन्यांकडे चांगले व्यवस्थापन कौशल्य असते.

मुंबई: बहुराष्ट्रीय कंपन्या (एमएनसी) या अशा कंपन्या असतात ज्या आपल्या देशासह इतर देशांतही व्यवसाय करतात. या कंपन्यांचे मध्यवर्ती कार्यालय असते. एमएनसी कंपन्या स्थानिक बाजारांसाठी जागतिक उत्पादने आणि सेवा पुरवतात ज्यात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्तम संस्थात्मक संस्कृतीचा समावेश असतो. ते गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध करून देतात.

जीएसटी कौन्सिलची थोड्याच वेळात बैठक ; ‘पेट्रोल-डिझेल’सह या वस्तू होऊ शकतात स्वस्त
भंडारकर इन्वेस्टमेंट सर्विसेसचे नित्यानंद भंडारकरसांगतात की, बहुराष्ट्रीय कंपन्या या बदलत्या काळाबरोबर आपली स्थिती मजबूत करणा-या सुस्थापित कंपन्या असतात. त्यांनी विविध बाजार चक्रांचा सामना केलेला असतो. यामुळे त्या केवळ बाजारात टिकून राहत नाहीत तर स्पर्धेत राहून वेगाने पुढे जाण्यातही त्यांनी यश मिळवले असते. हे संभाव्यतः मजबूत ब्रँडची कमतरता, पेटंट अधिकार, कमी किमतीच्या उत्पादन केंद्रांचे उत्पादन इत्यादींमुळे असू शकते. या कमतरतेची पूर्तता बहुराष्ट्रीय कंपन्यांना बाजारात त्यांचे स्थान सुरक्षित करण्यासह स्पर्धात्मक फायदा राखण्यात मदत करू शकतात.

income tax return : करदात्यांना दिलासा! प्राप्तीकर परतावा भरण्यास सरकारने दिली मुदतवाढ
ते पुढे सांगतात एक मजबूत आणि विश्वासार्ह व्यवस्थापन हा कोणत्याही कंपनीचा कणा आहे. एमएनसी कंपन्यांकडे चांगले व्यवस्थापन कौशल्य असते जे कंपनीला आर्थिक चक्राच्या माध्यमातून पुढे नेत स्पर्धात्मक फायदा कायम राखण्यात मदत करते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एमएनसी कंपन्यांवर आधारित आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएनसी फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

पीएसयू बॉण्डमध्ये गुंतवणूक; ‘बिर्ला म्युच्युअल’चा निफ्टी एसडीएल प्लस पीएसयू इंडेक्स फंड
भंडारकर सांगतात, बरेच एमएनसी फंड बाजारात उपलब्ध आहेत परंतु आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा एमएनसी फंड हा एक चांगला पर्याय आहे. जागतिक पालकत्वाचा (पॅरेन्ट) फायदा हा असा फायदा आहे जो एमएनसीसाठी अद्वितीय आहे. आवश्यक आर्थिक मदत पुरवण्याव्यतिरिक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जागतिक पालक उत्तम तांत्रिक ज्ञान, नव्या संधींपर्यंत प्रवेश, अद्ययावत अभियांत्रिकी आणि उत्पादन प्रक्रिया देखील प्रदान करू शकतात.

कच्च्या तेलात तेजी कायम ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव
इक्विटीवरील परतावा कंपनी किती उत्तमरीत्या व्यवस्थापित आहे आणि कंपनीला त्याच्या एकूण निव्वळ मालमत्तेतून किती नफा मिळतो हे ओळखण्यास मदत करू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या पालकांद्वारे संसाधनांचा प्रभावीपणे वापर करून इतर देशी कंपन्यांपेक्षा इक्विटीवर चांगला परतावा देऊ शकतात.

सेन्सेक्स ६० हजारांच्या दिशेने; ५०० अंकांची झेप, गुंतवणूकदारांनी कमावले एक लाख कोटी
ते पुढे सांगतात मजबूत बॅलन्स शीट कंपनीवर कर्ज नसल्याचे दर्शवते. यामुळे त्यांना संचालनाचे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आर्थिक स्वातंत्र्य मिळते. तसेच, जर कोणताही अप्रत्याशित खर्च समोर आला तर कंपनीवर कोणताही विशेष परिणाम होत नाही. एक मजबूत ताळेबंद असलेली कंपनी गुंतवणुकीची संधी निर्माण करते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: