Wtc Final 21 : विराट कोहलीने कालचीच चुक पुन्हा केली तर भारताला मोठा धोका, पाहा काय केलं होतं…


साऊदम्पटन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने काल एक मोठी चुक केली होती आणि त्याचा मोठा फटका संघाला बसला होता. विराटने आज पुन्हा हीच चुक केली तर संघासाठी हा एक मोठा धोका असू शकतो.

विराटने काल नेमकी कोणती मोठी चुक केली होती, पाहा…
भारताने काल जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा कोहलीकडून एक मोठी चुक घडली. त्यामुळेच भारतीय संघाला लवकर विकेट्स मिळू शकल्या नव्हत्या. भारतीय संघात सध्याच्या घडीला दोन्ही स्विंगसह वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू मोहम्मद शमी आहे. पण कोहलीने यावेळी गोलंदाजीची सुरुवात इशातं शर्मा आण जसप्रीत बुमरा यांच्याकडून केली. यावेळी इशांतने गोलंदाजी करताना ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकले, त्यामुळे त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले. पण त्यावेळी जर शमीच्या हाती चेंडू दिला असता तर भारतीय संघाला लवकर विकेट मिळवण्याची दाट शक्यता होती. कारण शमी हा फलंदाजानुसार गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो फलंदाजाच्या शरीराच्या जवळ जास्त गोलंदाजी करतो आणि त्यावेळी विकेट मिळण्याची जास्त संधी असते. हे सर्व समीकरण पाहता कोहलीने आपल्या गोलंदाजीची सुरुवात शमीकडून करायला हवी होती, जर तसे झाले असते तर कदाचित आताचे चित्र वेगळे असले असते. त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ जेव्हा सुरु होईल, तेव्हा आज कोहलीने शमीकडून सुरुवातीला गोलंदाजी करू घेतली तर त्याचा फायदा होऊ शकतो.

काल इशांत आणि बुमरा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पण या दोघांनाही चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकता आले नाहीत. कारण न्यूझीलंडचे सलामीवीर जर लवकर बाद झाले असते तर भारताला या सामन्यात पुनरागमन करण्याची चांगली संधी होती. पण भारताने काल ही संधी गमावली. त्यामुळे आज मिळालेल्या संधीचे कोहली सोने करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण भारतीय संघाने जर आज न्यूझीलंडच्या फलंदाजांना झटपट बाद केले तरच त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी असेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: