अफगाणिस्तान: काबूलमध्ये पुन्हा रॉकेट हल्ले; वीज केंद्राजवळ झाला हल्ला


काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलजवळील एका वीज केंद्राजवळ रॉकेट हल्ला झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक माध्यमांनी याबाबतची माहिती दिली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

गुरुवारी, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा रॉकेट हल्ला झाला. चमतलाह वीज उपकेंद्र या हल्ल्याचे लक्ष्य होते. या हल्ल्यात वीज केंद्राचे मोठे नुकसान झाले असते. मात्र, हल्ल्यात वीज केंद्र सुरक्षित राहिले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

फ्रान्सचा ‘आयएस’ला धक्का; ग्रेटर सहारा भागाचा म्होरक्या कारवाईत ठार

याआधी अफगाणिस्तानमध्ये काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ ऑगस्ट रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये १३ अमेरिकन सैनिकांसह १०० हून अधिक नागरिक ठार झाले होते. इस्लामिक स्टेट-खुरसान या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतली होती.

अमेरिका भारतात लष्करी तळ उभारणार?; परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचे संकेत
हा हल्ला झाला तेव्हा हजारो अफगाण नागरिक इतर देशांमध्ये पलायन करण्याच्या तयारीत होते. त्याशिवाय, भारत, अमेरिका, फ्रान्स आदी देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: