सेन्सेक्स ६० हजारांच्या दिशेने; ५०० अंकांची झेप, गुंतवणूकदारांनी कमावले एक लाख कोटी


हायलाइट्स:

  • सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली.
  • सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेत ५९६०० अंकापर्यंत मजल मारली.
  • या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत एक लाख कोटींची भर पडली.

मुंबई : करोना संकटातून उभारी घेणारी अर्थव्यवस्था आणि आज होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली आहे. सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली असून सेन्सेक्स ६० हजार अंकाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेत ५९६०० अंकापर्यंत मजल मारली. या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत एक लाख कोटींची भर पडली आहे.

कच्च्या तेलात तेजी कायम ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव
आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, एमएमसीजी, फार्मा आणि धातू क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २८ शेअर तेजीत आहे. ज्यात बजाज फायनान्स, आयटीसी, एसबीआय, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन, एचडीएफसी, रिलायन्स, कोटक बँक, एचयूएल , इन्फोसिस,एनटीपीसी , पॉवरग्रीड या शेअरमध्ये वाढ झाली आहे. डॉ. रेड्डी लॅब, टाटा स्टील या दोन शेअरमध्ये घसरण झाली आहे.

जीएसटी कौन्सिलची थोड्याच वेळात बैठक ; ‘पेट्रोल-डिझेल’सह या वस्तू होऊ शकतात स्वस्त
भांडवली बाजारात तेजीची लाट येण्यामागे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा प्रचंड ओघ कारणीभूत आहे. जुलै महिन्यात एफआयआयनी जोरदार विक्री केली होती. मात्र या महिन्यात पुन्हा एकदा ते भारतीय बाजारांकडे वळाले ज्यामुळे बाजाराचे मूल्यांकन वाजवीपेक्षा जास्त वाढले असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.

income tax return : करदात्यांना दिलासा! प्राप्तीकर परतावा भरण्यास सरकारने दिली मुदतवाढ
आज बँकिंग क्षेत्रात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे. सध्या सेन्सेक्स ५१३ अंकानी वधारला असून तो ५९६५४ अंकावर ट्रेड करत आहे. निफ्टी १३१ अंकांनी वधारला असून तो १७७६१ अंकावर आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: