मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; नऊ जखमी


हायलाइट्स:

  • बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला
  • पुलावर काम करणारे नऊ कामगार जखमी
  • शुक्रवारी पहाटे घडली घटना

मुंबईः मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex) परिसरात शुक्रवारी पहाटे बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ मजूर जखमी झाले आहेत. (under-construction flyover collapses in Mumbai)

उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने काही मजूर पूलावर उपस्थित होते. त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या पूलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी पूलाबरोबरच ८ ते १० मजूर खाली कोसळले. या सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बीकेसीच्या मुख्य रस्त्याला जोडणारा सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोडचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे ४च्या दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचा काही भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या व मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, हा उड्डाणपूल कसा कोसळला, याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये.

वाचाः शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची वर्णीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: