Nitin Gadkari: ‘यूट्यूब’ व्हिडिओद्वारे महिन्याला लाखोंची कमाई, नितीन गडकरींचा खुलासा


हायलाइट्स:

  • कोविड काळात कमाईचा नवा मार्ग शोधला
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खुलासा
  • ‘ऑनलाईनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीरित्या पोहचण्याची संधी’

इंदूर : कोविड काळात कमाईचा नवा मार्ग शोधून काढल्याचा खुलासा भारताचे केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हसत-खेळत केलाय. ते इंदूरमध्ये एका रस्ते प्रकल्पा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. आपण यूट्यूबच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास चार लाख रुपयांची कमाई करत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.

संकटात संधी‘ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बाणा नितीन गडकरी यांनी अंमलात आणलेला दिसतोय. त्यामुळे, कोविड काळात कमाईचा आणखी एक मार्ग त्यांनी शोधून काढला. याच मार्गावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीरित्या पोहचण्याची संधीही आपल्याला मिळाल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.

सुरुवातीला सहजपणे यूट्यूब व्हिडिओ तयार करण्याचं काम करण्यात आलं. परंतु, आता दर महिन्याला जवळपास चार लाखांचं उत्पन्न आपल्याला मिळत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.

Nitin Gadkari: वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी घोषणा
nitin gadkari : नितीन गडकरी म्हणाले, ‘…मी सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता’

कोविड लॉकडाऊन काळासंदर्भात बोलताना नितीन गडकरी यांनी आपला अनुभव लोकांसमोर मांडला. ‘कोविड काळानं दोन गोष्टी मला दिल्या. पहिली, मी घरी बसून यूट्यूबवर बघून अनेक पदार्थ बनवणं शिकलो आणि दुसरी म्हणजे, मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलू लागल्यानं जगात… अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी अनेक विद्यापीठं… भाषण देण्याची संधी मला मिळाली. मी कधी याची कल्पनाही केली नव्हती… आणि आज पाहा, मला महिन्याला चार लाख रुपये केवळ यूट्यूबच्या माध्यमातून मिळतात’ असं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं.

इंदूरच्या ब्रिलियंट कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात एकूण ९५७७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून १३५६ किलोमीटर लांब ३४ रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आलं. आपल्या कार्यकाळात केवळ मध्य प्रदेशात दीड लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना सुरूवात झाल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलं. तसंच पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा आपण मध्य प्रदेशात येऊन जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या नवीन योजनांना सुरूवात करणार असल्याचं आश्वासन त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला दिलंय.

amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कार्यक्रम ठरला! उद्या महाराष्ट्रात येणार
Ramdas Athawale: यूपी रणसंग्रमात उतरण्याची आठवलेंची इच्छा; भाजपकडे केली जागांची मागणीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: