योगा मुळचा नेपाळचा, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा दावा


प्रभू रामचंद्र मूळचे नेपाळचे होते असे वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली  यांनी केले होते. आता योगा मूळचा नेपाळचा असा दावा ओली यांनी केला आहे. तसेच आम्हाला त्याचा योग्य प्रचार करता नाही आला असेही ओली यांनी म्हटले.

आज आंतरराष्ट्रीय योगा दिन असून संपूर्ण जगात हा दिन उत्साहाने साजरा होत आहे. अशा वेळी ओली यांनी योगा मूळचा नेपाळचा असल्याचा दावा केला आहे. ओली म्हणाले की, योगाचा जन्म हिंदुस्थानात झालाच नाही, तेव्हा हिंदुस्थान नावाचा कुठलाही देश अस्तित्वात नव्हता. जेव्हा नेपाळमध्ये योगा प्रचलित झाला तेव्हा नेपाळच्या बाजूला अनेक देश होते. म्हणून योगाचा शोध नेपाळ किंवा उत्तराखंडमध्ये झाला असे ओली यांनी सांगितले. तसेच नेपाळमध्ये योगाचा शोध लागला परंतु त्याचा आम्हाला जगभरात तसा प्रचार नाही करता आला. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षातला सर्वात मोठा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यचा प्रस्ताव दिला तेव्हा योगाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली असेही ओली यांनी नमूद केले.

ओली यांनी यापूर्वी राम मूळचा नेपाळचा असून हिंदुस्थानातील अयोध्या ही नकली असून खरी अयोध्या नेपाळमध्येच असल्याचा दावा ओली यांनी केला होता. ओली यांचे विधान सोशल मीडियावर झळकताच नेटकऱ्यांनी त्यांची बेदम धुलाई केली होती. खुद्द ओली यांचा स्वपक्ष असलेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षानेही पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: