११ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीचं नाव समोर आल्यानंतर गावात खळबळ


हायलाइट्स:

  • गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार
  • मुलीवर अत्याचार करणारा आरोपी ६५ वर्षाचा वृद्ध
  • नराधमाला पोलिसांनी केली अटक

सातारा : जावळी तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलीवर अत्याचार करणारा ६५ वर्षाचा वृद्ध असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मेढा पोलीस स्थानकात बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५, रा. नेवेकरवाडी, तालुका जावळी) या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणारा संशयित आरोपी बबलिंग उर्फ बबन सपकाळ हा पीडित मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर खेळत असतानाच तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि सदर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

संतापजनक! १३ व्या वर्षी लग्न आणि नंतर छळ; आई आणि मावशीच बनल्या काळ

अत्याचारानंतर याबाबत बाहेर कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही या नराधमाने पीडित मुलीला दिली. मात्र मुलीने मोठ्या धाडसाने यासंदर्भात घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मेढा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सपकाळ याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणाची अधिक चौकशी व तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.



Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: