Coronavirus Vaccine करोना लसीकरणात चीन सुस्साट; १०० कोटींहून अधिक डोस दिले


हायलाइट्स:

  • करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध पातळीवर प्रयत्न
  • अनेक देशांचा करोना लसीकरणावर भर
  • चीनमध्ये लसीकरणात १०० कोटीहून अधिक डोस दिले

बीजिंग: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी करोना लसीकरणावरही भर दिला आहे. करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या चीनने करोनापासून बचाव करण्याच्या दृष्टीने मोठे उद्दिष्ट्य साध्य केले आहे. चीनने आपल्या देशात लसीकरण मोहिमेला वेग दिला असून १०० कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मागील काही महिन्यांपासून चीनने लसीकरण मोहिमेला गती दिली होती.

करोनाचा संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यातच चीनने महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर करोना चाचणी आणि लसीकरणावर भर दिला. करोनाचे वेगवेगळे वेरिएंट आढळत असताना चीनने लसीकरणाला गती दिली. करोनाच्या वेरिएंटपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरू झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनमध्ये मागील पाच दिवसात १० कोटी डोस दिले आहेत. मात्र, १०० कोटी पैकी किती नागरिकांना दोन डोस देण्यात आले, याबाबतची कोणतीही माहिती चिनी प्रशासनाने दिली नाही.

वाचा:करोना लशीचे दोन भिन्न डोस प्रभावी?; WHO ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

वाचा: चांगली बातमी ! करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याचा धोका कमी असल्याचा दावा

मार्च महिन्याच्या अखेरिस पासून चीनने लसीकरण मोहिमेला वेग दिला. चीनला १०० दशलक्ष ते २०० दशलक्ष हा टप्पा गाठण्यासाठी फक्त २५ दिवसांचा कालावधी लागला. तर, पुढील १०० दशलक्ष डोसचे लक्ष्य साध्य करण्यास १६ दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर ८०० ते ९०० दशलक्ष डोसचे लक्ष्य गाठण्यास फक्त सहा दिवसांचा कालावधी लागला. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने ही सर्वात मोठी लसीकरण असल्याचे म्हटले. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, जगभरात २.५९ अब्ज लशीचे डोस देण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार जगातील ३५ टक्के डोस चीनमध्ये देण्यात आले आहेत.

वाचा: ब्राझीलमध्ये करोना मृतांची संख्या पाच लाखांवर; विरोधकांचे आंदोलन

करोना: चीनमध्ये डेल्टा वेरिएंटचा प्रकोप; नागरिकांसाठी निर्बंध लागू, ड्रोनही तैनात
चीनमधील दोन लाख परदेशी नागरिकांचेही लसीकरण झाले असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली. या वर्षाच्या अखेरीस जवळपास ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चीनमध्ये मागील वर्षी एकूण २१ लशीची चाचणी झाली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: