Hyderabad Rape and Murder: चिमुरडीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला


हायलाइट्स:

  • राज्यातील मंत्र्यांनी दिली होती एन्काऊन्टरची धमकी
  • आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला
  • शरीरावरच्या काही निशाणींवरून पोलिसांनी पटवली मृतदेहाची ओळख

हैदराबाद : हैदराबादमध्ये अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर एकच खळबळ उडालीय. याचं कारण म्हणजे, राज्य सरकारमधील एका मंत्र्यांकडून आरोपीला शोधून काढून एन्काऊन्टर करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला.

तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतदेहावरील टॅटूचे निशाण आणि इतर ओळखीनंतर हा बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याची ओळख पटलीय. तेलंगणा पोलिसांकडून या आरोपीला शोधून कढण्यासाठी १० लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.

तेलंगणा पोलीस महासंचालकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. ही जागा घानपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. मृताच्या शरीरावर मिळालेल्या निशाणीवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. या ट्विटमध्ये पोलिसांनी रेल्वे रुळावर आढळून आलेल्या मृतदेहाचे काही फोटोही शेअर केले आहेत.

आरोपीनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी व्यक्त केलाय. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार होता. ३० वर्षीय आरोपीचं नाव पल्लाकोंडा राजू आहे. आरोपीला शोधून काढण्यासाठी आरोपीच्या फोटोसोबतच त्याची ओळख पोलिसांनी जाहीर केली होती. लांब केस, हातांवर टॅटू, गळ्यात स्कार्फ आणि शरीरावरील काही आभूषणांवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवलीय.

Hyderabad Rape and Murder: बलात्काराच्या आरोपीला पकडून एन्काऊन्टर करणार, मंत्र्यांचा तोल ढळला
‘काका मला जाऊ द्या’, खो-खो खेळाडूच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवरून आरोपीला बेड्या

बलात्काराच्या आरोपींचं एन्काऊन्टर

दोन दिवसांपूर्वीच तेलंगणाचे तेलंगना सरकारमध्ये कामगार मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे मल्ला रेड्डी यांनी या घटनेची तीव्र निंदा केली होती. मात्र यावेळी ‘आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून त्याचा एन्काऊन्टर करणार’ असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं.

त्याअगोदर तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमधील एका सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचं एन्काऊन्टर केल्याची घटना घडली होती. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी एका तरुण डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना शोधून काढून अटक केली. परंतु, ६ डिसेंबर रोजी शादनगर भागाजवळ एका चकमकीत चारही आरोपी ठार करण्यात आले. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपींना पोलिसांनी आत्मसमर्पणाची संधी दिली परंतु, त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर प्रत्यूत्तरादाखल करण्यात आलेल्या गाोळीबारात चारही आरोपी ठार झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. ‘दिशा एन्काऊन्टर’ नावानं प्रसिद्धीस आलेल्या या एन्काऊन्टरवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

Rajasthan Police Sex Scandal: ‘सेक्स स्कँडल’ समोर आल्यानंतर दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई
Terrorists Arrested: दहशतवाद्यांना सिंध प्रांतात प्रशिक्षण, ‘आयएसआय’चा सहभाग स्पष्टSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: