दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा फैसला झाला; हा खेळाडू करणार नेतृत्व


दुबई: आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्राला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या टप्प्यात शानदार कामगिरी केली होती. तेव्हा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे नेतृत्व विकेटकीपर ऋषभ पंतकडे देण्यात आले होते. करोनामुळे आयपीएल स्पर्धा ३ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. आता आयपीएल पुन्हा सुरू होत असून श्रेयस अय्यर पुन्हा संघात दाखल झाला आहे.

वाचा- विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले; वर्ल्डकपनंतर होणार पायउतार

गेल्या काही दिवासांपासून दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा होती. श्रेयसच्या गैरहजेरीत पंतने दिल्लीला ८ पैकी ६ सामन्यात विजय मिळून दिला होता. ते १२ गुणांसह अव्वल स्थानी आहेत. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन कर्णधार बदलणार का याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर दिल्ली कॅपिटल्सने उर्वरित आयपीएलच्या हंगामासाठी कर्णधारपदाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्राचा कर्णधार पंतच संघाचे नेतृत्व करणार असल्याचे दिल्लीने आज गुरुवारी स्पष्ट केले.

वाचा- टी-२०चा ‘किंग’ होणार भारताचा नवा कर्णधार; चाहत्यांची प्रतिक्षा संपली

वाचा- शार्दूल ठाकूरचा मोठा खुलासा; इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला दिली होती घाणेरडी शिवी

गेल्या वर्षी म्हणजे आयपीएल २०२० मध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला होता. या वर्षी देखील दिल्लीने धमाकेदार सुरूवात केली होती. त्यांनी पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. त्याच बरोबर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू या दोन संघांनी त्यांचा पराभव केला होता.

वाचा- भारतीय संघाला मोठा धक्का; महत्त्वाची मालिका स्थगित केलीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: