gujarat 24 ministers sworn in : भाजपचा धक्का; गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारमध्ये सर्व २४ मंत्री नवीन, रुपानींच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना डच्चू


अहमदाबादः गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ( Bhupendra Patel Cm ) यांनी आपली संपूर्ण टीम तयार केली आहे. राजभवनमध्ये आज दुपारी दीड वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात एकूण २४ मंत्र्यांनी शपथ घेतली. १० कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्र्यांचा यात ( Gujarat 24 Ministers Sworn In ) समावेश आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व २२ मंत्र्यांना भूपेंद्र पटेल यांनी नारळ दिला आहे. यात माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. नव्या कॅबिनेटची पहिली बैठक ही आज संध्याकाळी ४.३० वाजता आहे. याच बैठकीत मंत्र्यांचे खातेवाटप केले जाईल, असं सांगण्यात येतंय.

कोणी-कोणी घेतली मंत्रीपदाची शपथ?

कॅबिनेट मंत्रीः राजेंद्र त्रिवेदी, जीतू वाघानी, राघव पटेल, पूर्णेश मोदी, नरेश भाई पटेल, प्रदीप सिंह परमार, अर्जुन सिंह चव्हाण, ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा

राज्यमंत्रीः हर्ष सांघवी, बृजेश मेरजा, मनिषा वकील, जगदीश भाई पांचाल, जितूबाई चौधरी, निमिषा सुतार, मुकेश पटेल, अरविंद रैयाणी, कुबेर डिंडोर, किर्ती सिंह वाघेला, गजेंद्र सिंह परमार, देवा भाई मालम, राघवजी मकवाना, विनोद भाई मोराडिया

bjp changing chief ministers : भाजप राज्यांचे मुख्यमंत्री का बदलतेय? इतर मुख्यमंत्र्यांची धडधड वाढली

नव्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण?

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. आता भूपेंद्र पटेल यांच्या कॅबिनेटमधील ५-५ जणांच्या गटात मंत्र्यांचा शपथविधी झाला. सर्व प्रथम राजेंद्र त्रिवेदी यांनी शपथ घेतली. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला. राजीनामा दिल्याच्या एका तासानंतर ते मंत्री झाले. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात ते दुसऱ्या क्रमांकावर असतील, असं बोललं जातंय.

Nitin Gadkari: वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी घोषणा

कलहामुळे टाळला होता नव्या मंत्र्यांचा शपथविधी

नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा बुधवारी दुपारी होणार होता. पण नव्या मंत्रिमंडळावरून माजी मुख्यमंत्री रुपानी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे नाराज होते. यावरून बुधवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत आमदार आणि विरष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. यानंतर पक्ष नेतृत्वाने नाराज नेत्यांचे मन वळवण्याची जबाबदारी ही माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर सोपवली. नव्या मंत्र्यांचा आज शपथविधी होताच, नाराजी व्यक्त करणाऱ्या रुपानींच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना नारळ देण्यात आला.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: