करोना महासाथीचा कहर; WHO ने दिली ‘ही’ दिलासादायक बातमी!


जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने दिलासादायक माहिती दिली आहे. मागील आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या करोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. त्याशिवाय करोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या दक्षिण-पूर्व आशिया भागात झाली आहे. तर, आफ्रिकामध्ये करोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे.

करोना लशीचा बुस्टर डोस हवा की नको? तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे
तर, अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्येे सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. वेगाने फैलावणाऱ्या डेल्टा वेरिएंटचा संसर्ग १८० देशांमध्ये झाला आहे.

करोनावर युएईने प्रभावी औषध शोधले?; चार दिवसात गंभीर रुग्ण ठणठणीत बरे!

ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, वयस्करांच्या तुलनेत करोना विषाणूची लागण मुलांना आणि युवकांना कमी प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना करोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचेही समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

अमेरिका: शाळा सुरू होताच मुलांना करोनाची लागण!; सात लाखांहून अधिक बाधित
दरम्यान, फ्रान्समध्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाविरोधी लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांना कामावर रुजू होण्यास मनाई करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये जवळपास तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोना लस घेतली नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: