संरक्षण मंत्रालयाच्या खास समितीवर MS धोनीची निवड; यासाठी करणार काम


नवी दिल्ली: देशाच्या संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये सुधारणा करण्यासाठी एका उच्च स्तरीय तज्ञ समितीची निर्मिती केली आहे. या समितीचे अध्यक्ष खासदार बायजयंत पांडा हे असणार आहेत. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि उद्योजक महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा समावेश करण्यात आला आहे.

वाचा- शार्दूल ठाकूरचा मोठा खुलासा; इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला दिली होती घाणेरडी शिवी

धोनीला याआधीच संरक्षण दलाने मानद कर्नलपद दिले आहे. त्याने भारतीय संरक्षण दलात एक महिना काम देखील केले आहे. आनंद महिंद्र हे देशातील आघाडीचे उद्योजग आहेत. देशाच्या सरंक्षण दलासाठीच्या शस्त्र निर्मिती कार्यक्रमात त्यांच्या समहूचा सहभाग आहे.

वाचा- अ‍ॅशेस मालिकेवर खेळाडू बहिष्कार टाकणार; हे आहे कारण

मोदी सरकारने NCCमध्ये अमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. NCCच्या विस्ताराला संरक्षण मंत्रालयाने ऑगस्ट २०२०मध्ये मंजूरी दिली होती. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२०च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणा केली होती. देशातील तरुणांना कमी वयात सरंक्षण दलात काम करण्याचा अनुभव घेता यावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

वाचा- भारतीय संघाला मोठा धक्का; महत्त्वाची मालिका स्थगित केली

भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार असलेल्या धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळतोय. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. आयपीएल २०२१चे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार असून धोनीच्या संघाची लढत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

वाचा- लैंगिक शोषणाची साक्ष देताना ढसाढसा रडल्या खेळाडू; फक्त डॉक्टर नाही तर…Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: