मुतखड्याच्या आजाराला कंटाळून जळगावात तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दु:खाचा डोंगर


हायलाइट्स:

  • जळगावात २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
  • मुतखड्याच्या आजाराला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
  • जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

म. टा. प्रतिनिधी । जळगाव

जळगाव शहरातील काशिबाई कोल्हे शाळेच्या मागच्या आवारात एका झाडाला स्कार्फ बांधून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. मुतखड्याच्या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिनेश कमलाकर ठाकूर (वय २३, रा. पांझरपोळ चौक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसीत काम करणारा दिनेश ठाकूर हा तरुण आपल्या आई कल्पनाबाई यांच्यासह राहत होता. त्याचा मोठा विवाहित भाऊ गोपाळ हा पत्नीसह धुळे येथे राहतो. गेल्या दोन महिन्यांपासून दिनेशचा मुतखड्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे तो नैराश्यात होता. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मित्र गावाहून येत आहे, त्याला भेटण्यासाठी जातो असे आईला सांगून तो घराबाहेर पडला होता. यानंतर घरी परतलाच नाही.

वाचा: आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार: हायकोर्ट

मध्यरात्रीच्या सुमारास त्याने काशिबाई कोल्हे शाळेच्या मागच्या बाजूस एका झाडाला स्कार्फ बांधून गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता परिसरातील नागरिकांना ही घटना कळाली. यांनतर त्यांनी शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. यांनतर पोलिसांनी ओळख पटवून दिनेशच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. मुतखड्याच्या त्रासाला कंटाळून दिनेशनं आत्महत्या केल्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाचा: टॅक्स लावण्याच्या अधिकारावर गदा आली तर…; अजित पवारांचा केंद्राला इशाराSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: