अ‍ॅशेस मालिकेवर खेळाडू बहिष्कार टाकणार; हे आहे कारण


नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात या वर्षाच्या अखेरीस प्रतिष्ठेची अ‍ॅअशेस मालिका खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार असून त्याच्या आधी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. इंग्लंडचे खेळाडू या मालिकेवर बहिष्कार टाकू शकतात.

वाचा- भारतीय संघाला मोठा धक्का; महत्त्वाची मालिका स्थगित केली

इंग्लंडचे खेळाडू मालिकेवर बहिष्कार टाकू शकतात. यामागे ऑस्ट्रेलियातील नियम आहेत. करोनामुळे ऑस्ट्रेलियात स्थानिक नियम फार कठोर केले आहेत. दरम्यान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड अजूनही सर्व सिनिअर खेळाडूंना आणि स्टाफला पाठवण्यावर ठाम आहे. त्यांनी मालिका स्थगित करण्याचा विचार केलेला नाही. पण बोर्डाच्या या निर्णयावर खेळाडू आणि स्टाफ नाराज आहेत.

वाचा- लैंगिक शोषणाची साक्ष देताना ढसाढसा रडल्या खेळाडू; फक्त डॉक्टर नाही तर…

संघ आणि बोर्डाचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमकूवत संघ उतरण्याची शक्यता वाढली आहे. बोर्ड अन्य पर्यायांवर विचार करत आहे. संपूर्ण संघच मालिकेवर बहिष्कार टाकू शकतो. यात सपोर्ट स्टाफचा देखील समावेश आहे.

वाचा- रवी शास्त्री राजीनामा देणार; मुदत वाढवण्याची BCCIची विनंती फेटाळली

इंग्लंडच्या खेळाडूंची नाराजी ऑस्ट्रेलियातील कठोर नियमांमुळे आहे. ऑस्ट्रेलियातील नियमांमुळे खेळाडूंना चार महिने हॉटेलच्या रुममध्ये रहावे लागू शकते. जर नियमांमध्ये सवलत मिळाली नाही तर खेळाडू ऑस्ट्रेलियात जाण्यास उत्सुक असणार नाहीत.

वाचा- IPL 2021चे नवे वेळापत्रक; कधी, कुठे होणार सामने आणि Live online streamingSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: