गेवराई येथे कार अडवून पावणेचार लाख रुपयांची रक्कम लंपास


पेट्रोलपंपावरील दिवसभर जमा झालेली रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या मालकाची गाडी तिघा जणांनी अडवून गाडीच्या काचा फोडून चार लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली. ही घटना रविवारी रात्री उशिरा गेवराईजवळ घडली.

येथील ओमप्रकाश मदनराव बेद्रे आणि अमोल दिलीप कुलथे या दोघांच्या भागीदारीत पेट्रोलपंप आहे. रविवारी दिवसभर जमा झालेली रक्कम 3 लाख 76 हजार 850 रुपये काळ्या बॅगमध्ये घेऊन ओमप्रकाश बेद्रे रविवारी रात्री अकरा वाजता स्वत:ची कार (एम.एच. 23 ए.डी. 4011) घेऊन घराकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपापासून अंदाजे तीनशे किलोमीटरवर रस्ता दुभाजक ओलांडण्यासाठी ते थांबले असता अचानक शहागडच्या दिशेने एक विनाक्रमांकाची कार त्यांच्या गाडीला आडवी आली. त्यातील दोघे जण बेद्रे यांच्याजवळ आले आणि गाडीतील बॅग दे अन्यथा जीवे मारू, अशी धमकी त्यांनी दिली. त्याचवेळी एकाने लोखंडी शस्त्राने कारची काच फोडली आणि पुढच्या सीटखाली ठेवलेली पावणेचार लाख रुपये ठेवलेली बॅग घेऊऩ कारमधून पसार झाले. या प्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: