पाहा: बापरे! अमेरिकन नौदलाकडून समुद्रात १८ हजार किलो बॉम्बचा स्फोट


हायलाइट्स:

  • चिनी नौदलाच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न
  • नौदलाच्या एअरक्राफ्ट कॅरिअर गेराल्ड फोर्डची चाचणी
  • जवळपास १८ हजार किलोंचा हा महाबॉम्ब समुद्रात डागला

वॉशिंग्टन: चिनी नौदलाच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन नौदलाने आपल्या नवीन एअरक्राफ्ट कॅरिअरवर बॉम्ब हल्ल्याची चाचणी केली. अमेरिकन नौदलाने समुद्रात एक भीषण स्फोट घडवून आणला. जवळपास १८ हजार किलोंचा हा महाबॉम्ब एअरक्राफ्ट कॅरिअर गेराल्ड फोर्डने समुद्रात डागला. स्फोट घडवून आणल्यानंतर भूंकपासारखे हादरे जाणवले.

अमेरिकन नौदलाने याला ‘फुल शिप शॉक ट्रायल’ म्हटले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट घडवून आणल्यानंतर समुद्रात ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. अमेरिकन नौदलाने मागील शुक्रवारी ही चाचणी केली. फ्लोरीडातील डयटोना किनाऱ्यापासून १०० मैल अंतरावर ही चाचणी झाली.

वाचा:इराणचा एकमेव अणू ऊर्जा प्रकल्प अचानक बंद; मोसादची पुन्हा कारवाई?

वाचा: अमेरिका रशियन ब्रह्मास्त्र ‘एस-४००’ उद्धवस्त करणार!; आफ्रिकेत युद्ध सराव

व्हिडिओ व्हायरल
अमेरिकन नौदलाने हा स्फोट पाण्यात केला. युद्धप्रसंगी एखाद्या हल्ल्यात एअरक्राफ्ट कॅरिअर किती मारा झेलू शकतो याबाबतची चाचणी करण्यात आली. या महास्फोटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा: आश्चर्यच! ; अवघ्या २९ तासांत उभी राहिली १० मजली इमारत

वाचा: उत्तर कोरियात खाद्यान्न संकट; दोन महिन्याचा अन्नधान्य साठा, महागाईचा आगडोंब

या बॉम्बस्फोटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण हा स्फोट पूर्णपणे सुरक्षित असल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. या स्फोटाद्वारे एअरक्राफ्ट कॅरिअर युद्धात किती प्रभावी ठरू शकतो, याची चाचपणी करण्यात आली. या स्फोटामुळे समुद्रातील पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नौदलाने म्हटले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram