‘आता तरी सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकादमी सुरु करावी’ असं का म्हणाले जितेंद्र आव्हाड पाहा…


मुंबई : सुनील गावस्कर हे खेळाडू म्हणून महान होतेच, पण त्यांनी आतातरी क्रिकेट अकादमी सुरु करावी, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी व्यक्त केले आहे. आव्हाड यांचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे.
गावस्कर यांना आव्हाड असं का म्हणाले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…
सुनील गावस्कर हे तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर गावस्कर यांनी क्रिकेटसाठी भरीव योगदान दिले आहे. आतातर या अकादमीच्या माध्यमातून गावस्कर यांनी क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे ठरवले आहे. सुनील गावस्कर फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारकडे यावर्षी २७ जानेवारीला वांद्रे-कुर्ला संकुल येथे इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी भुखंड मागितला होता. या दोन हजार चौ. मी. भुखंडाला आज मान्यता देण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं आहे, पाहा…
गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनील गावस्कर यांच्यासाठी बदलला. आतातरी सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच ईच्छा, असे आव्हाड यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटलं आहे की, जर सुनिल गावस्कर नसते तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो.

या इनडोअर सेंटरमध्ये काय असेल, जाणून घ्या…
या भुखंडावर हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा, स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्कॉश या खेळासाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षण केंद्रामध्ये बॅडमिंटन, फुटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात खेळाडूंना दुखापत झाली असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी मेडिसीन सेंटरही बांधण्यात येणार आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: