rahul gandhi : ‘राहुल गांधींमध्ये हिंदू रक्त आहे असं वाटत नाही’


भोपाळः मध्य प्रदेशचे भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींमध्ये हिंदू रक्त आहे, असं वाटत नाही. म्हणून ते हिंदू देवी-देवतांचा अपमान करत आहेत. राहुल गांधींनी माफी मागावी. त्यांच्याविरोधात आपण एफआयआर दाखल करणार आहोत, असंही शर्मा म्हणाले.

भाजप आणि आरएसएस हे खरे हिंदू नाहीत. ते लक्ष्मी आणि दुर्गा यांचा अपमान करतात, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या टीकेला रामेश्वर शर्मा यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधीजी, तुम्हीही हिंदू नाहीत. तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते. पण आम्हाला स्वतःला हिंदू म्हणायला अजिबात लाज वाटत नाही. पंडित नेहरू पंतप्रधान होते तेव्हाही देशाचे तुकडे झाले होते आणि हजारो हिंदूची हत्या झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात आहे, याचे तुम्ही आभार मानले पाहिजेत, असं शर्मा म्हणाले.

rahul gandhi attacked on bjp-rss : ‘भाजप हिंदू विरोधी, लक्ष्मी आणि दुर्गेची शक्ती फक्त १०-१५ जणांच्या हाती’

राहुल गांधींची आई ख्रिश्चन. त्यांचे बहिणीचे पती ख्रिश्चन. यामुळे राहुल गांधींमध्ये हिंदू रक्त आहे, असं वाटत नाही. राहुल गांधींनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागवी. त्यांच्याविरोधात उद्या एफआयआर दाखल करणार, असं भाजप आमदार रामेश्वर शर्मा म्हणाले.

bhupendra patel : गुजरातमधील भूपेंद्र पटेल सरकारच्या २७ नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी, सर्व नवे चेहरेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: