सहा महिन्यात एकही टी-२० मॅच न खेळता विराटला झाला हा फायदा


दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी टी-२० क्रमवारी जाहीर केली. या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला फायदा झाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडचा डेवोन फिलिप कॉन्वे याला मागे टाकले. विराटचे ७१७ गुण असून कॉन्वेचे ७०० गुण आहेत. विशेष म्हणजे विराटने अखेरची टी-२० मॅच २० मार्च रोजी अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध खेळली होती.

वाचा- IPLचे दुसरे सत्र: कोण जाणार प्लेऑफमध्ये, या संघांना आहे संधी

गेल्या सहा महिन्यात एकही टी-२० मॅच न खेळता विराटला क्रमवारीत फायदा झाला. या क्रमवारीत विराट वगळता एकच भारतीय फलंदाज आहे. केएल राहुल ६९९ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान ८४१ गुणांसह पहिल्या स्थानावर तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८१९ गुणांसह दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच ७३३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सचे टेन्शन संपले; रोहितने सुरू केली तयारी, या तारखेला मैदानात उतरणार

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर आणि फलंदाज क्विंटन डी कॉकला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील कामगिरीचा फायदा झाला. तो टॉप १० मध्ये पोहोचला आहे. डी कॉक सध्या ८व्या क्रमांकावर आहे.

वाचा- RCB आणि विराटसाठी आनंदाची बातमी; या खेळाडूचे ४६ चेंडूत स्फोटक शतक

वाचा- IPL दुसरे सत्र सुरू होण्याआधी CSKला मोठा सेटबॅक, एक खेळाडू जखमी तर दुसरा….

गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी पहिल्या स्थानावर आहे. त्याचे ७७५ गुण आहेत. श्रीलंकेचा वनिंडू हसरंगा ७४७ गुणांसह दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा राशिद खान ७१९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या दहामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: