IND vs NZ WTC Final: विकेट मिळवण्यासाठी सुरु आहे संघर्ष; भारतीय संघाने केली मोठी चूक


साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात २१७ धावा केल्या. उत्तरा दाखल न्यूझीलंडने दिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ बाद १०१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांप्रमाणे भारताच्या गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही.

वाचा- WTC Final Day 4 Live: क्रिकेट बंद, टेबल टेनिस सुरू; पाहा ताजे फोटो

न्यूझीलंडच्या डावात तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत होते. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावा केल्या. टॉम लॅथमला भारताचा फिरकीपटू आर अश्विनने बाद केले. तर दुसरी विकेट इशांत शर्माने घेतली. भारताचे जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना विकेट घेण्यात अपयश आले. या उटल न्यूझीलंडचा जलद गोलंदाज काइल जेमीसनने पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या.

वाचा- फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू

भारतीय गोलंदाजांच्या या अपयशावर अनेक जण टीका करत आहेत. तिघाही जलद गोलंदाजांना द रोझ बाउल मैदानावर चेंडू स्विंग करता येत नव्हता. अशात सोशल मीडियावर अनेकांना जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारची आठवण आली. अनेकांनी भुवीचा विचार का केला नाही असा सवाल देखील विचारला.

वाचा- IND vs NZ WTC Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या दिवशी काय होणार? वाचा मोठी अपडेट

WTC फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भुवीचा विचार केला गेला नाही. भारतीय गोलंदाज जेव्हा विकेटसाठी भारतीय गोलंदाज झटत होते तेव्हा सोशल मीडियावर भुवी ट्रेडिंगमध्ये होता.

वाचा- …आणि भारताचा विजय पक्का

भारताला पहिली विकेट ३५व्या षटकात दुसरा चेंडू मिळाल्यानंतर मिळाली. भारत या सामन्यात तीन जलद गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरला आहे. यातील एकालाही सुरुवातीला विकेट मिळून देता आली नाही. सोशल मीडियावर अनेकांनी या गोलंदाजांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. इंग्लंडमध्ये जी परिस्थितीत आहे त्यामध्ये भुवनेश्वर कुमार सारख्या स्विंग गोलंदाजाची गरज आहे. ते चेंडू हवेत मूव्ह करू शकतो.

भुवीची इंग्लंडमधील कामगिरी

भुवनेश्वरने इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत. २०१४च्या इंग्लंड दौऱ्यात त्याने दोन वेळा पाच विकेट घेतल्या होत्या. त्या मालिकेत भुवीने फक्त गोलंदाजी नाही तर बॅटने कमाल केली होती. त्याने तीन अर्थशतक झळकावले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: