अफगाणिस्तान: तालिबानच्या दोन गटांतील वाद शिगेला!; बरादरने काबूल सोडले?


काबूल: तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली असली तरी त्यांच्यातील गटबाजी वाढत असल्याचे चित्र आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील सत्तासंघर्ष वाढत असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेण्याच्या श्रेयावरून दोन गटांच्या समर्थकांमध्ये वाद झाला असल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रपती पॅलेसमध्येच वाद झाल्याचे वृत्त आहे. या वादानंतर तालिबान नेता मुल्ला अब्दुल बरादर याने काबूल सोडले आहे.

‘बीबीसी’ने दिलेल्या वृ्त्तानुसार, अफगाणिस्तानमधून अमेरिकेला माघारी पाठवण्यास कोणाची महत्त्वाची भूमिका होती यावरून वाद झाला. त्याशिवाय तालिबान सरकारच्या खातेवाटपावरूनही वाद झाला.

तालिबानने वादाचे हे वृत्त फेटाळून लावले आहे. तालिबान नेता आणि अफगाणिस्तान सरकारचा उप-पंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. काबूलमध्ये कतारचे परराष्ट्रमंत्री शेख महंमद बिन अब्दुलरहमान अल् थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये बरादर दिसला नाही. त्यामुळे तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील वाद वाढला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

अफगाणिस्तान: बंदुकीच्या धाकावर भारतीय व्यावसायिकाचे अपहरण
‘बीबीसी’ने म्हटले की, तालिबानचा मुल्ला बरादर आणि खलील-उर-रहमान हक्कानी यांच्यात तीव्र वाद झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्येही वाद झाला. ही भांडणे मागील आठवड्यात झाली असल्याचे म्हटले जाते. वृत्तानुसार, अंतरिम सरकारमध्ये झालेल्या खाते वाटपावरही मुल्ला बरादर नाराज होता.

मुल्ला बरादर हा बऱ्याच महिन्यांपासून दोहामध्ये सुरू असलेल्या चर्चांमध्ये सहभागी होता. या ठिकाणी अमेरिका आणि अन्य देशांसोबत चर्चा झाली. तर, हक्कानी नेटवर्क पूर्णपणे अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अफगाण सैन्यासोबत संघर्ष केला.

तालिबानी दहशतीच्या छायेत हक्कांसाठी महिलांचा लढा
दरम्यान, हक्कानी आणि बरादर गटामध्ये संघर्ष होऊन बारदर मारला गेल्याचे वृत्त अफवा असल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबानचा प्रवक्ता सुलैल शाहीन याने ही माहिती दिली. उपपंतप्रधान म्हणून नेमणूक झालेला बरादर याचा ऑडिओ संदेश त्यासाठी जारी करण्यात आला आहे. शाहीन याने ट्वीटरवर माहिती दिली, की असे वृत्त पूर्ण निराधार आहे. कंदाहारमध्ये बैठकीमध्ये बरादर असल्याचा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. बरादर याने अमेरिकेबरोबरील चर्चेत भाग घेऊन करारासाठी प्रयत्न केले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: