प्रताप सरनाईकांचे फोडाफोडीचे आरोप; राष्ट्रवादीनं सांगितला ‘तो’ नियम


हायलाइट्स:

  • हसन मुश्रीफ यांनी फेटाळले प्रताप सरनाईक यांचे आरोप
  • भाजपसह चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला निशाणा
  • पाच नव्हे ३५ वर्षे हे सरकार कायम राहील – मुश्रीफ

म.टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बचा वापर करून महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. डोक्यावर हात ठेवून सांगतो की हे सरकार पाच नव्हे ३५ वर्षे कायम राहील,’ असा विश्वास ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ bयांनी आज कोल्हापुरात व्यक्त केला. ‘आम्ही शिवसेनेला मोठ्या मनानं सांभाळत आहोत, त्यामुळे शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असंही ते म्हणाले. (Hasan Mushrif Refutes allegations made by Pratap Sarnaik)

आमदार सरनाईक यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ग्राम विकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपने गेली दोन-तीन महिने आमदार सरनाईक यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यातूनच त्यांनी हे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यामध्ये आम्ही सेनेचे आमदार फोडत आहोत असा आरोप केला, पण हा आरोप पूर्णपणे निराधार व चुकीचा आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा नेते फोडायचे नाहीत असा नियमच झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमेकांनी नेते फोडायचे, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हा नियम असताना आम्ही सेनेचे नुकसान कसे करू असा सवालही त्यांनी केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दहा सदस्य असताना त्यांना तीन पदे दिली, गोकुळ दूध संघात सहा जागा दिल्या अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

वाचा: नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव असावे?; राज ठाकरे म्हणाले…

मुश्रीफ म्हणाले, गेल्या अठरा महिन्यात महा विकास आघाडी कशी भक्कम होईल यासाठीच आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे आमच्यात मतभेद नाहीत. हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने करू नये, अजून पस्तीस वर्षे हे सरकार टिकेल. सरकार अस्थिर होत नाही हे लक्षात आल्यामुळेच केंद्र सरकारने आमच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा आरोपीही मुश्रीफ यांनी केला.

वाचा: प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर भुजबळ नाराज?; म्हणाले…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत, कधी एकदा सत्तेत जाऊन बसू असं त्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांची विविध मार्गाने धडपड सुरू आहे असा टोला मारताना मुश्रीफ म्हणाले , मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत असा आरोप करणे चुकीचे आहे. उलट त्यांच्या आमदाराची दुप्पट कामे झाली तर आमची काही अडचण नाही.

प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याची आम्हाला हौस नाही: संभाजीराजेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: