IPLचे दुसरे सत्र: कोण जाणार प्लेऑफमध्ये, या संघांना आहे संधी


दुबई: आयपीएलच्या १४व्या सत्रातील शिल्लक ३१ लढतींना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा ३ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. स्पर्धेत २९ लढती झाल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ पैकी ६ विजयासह सध्या गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले आहे. शिखर धवन ३८० धावांसह तर हर्षल पटेल १७ विटेकसह अव्वस स्थानावर आहे.

आयपीएलचे दुसरे सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यात काही बदल देखली झालेले दिसतील. पहिल्या सत्रात भारतात खेळणारे संघ आता युएईमधील खेळपट्टीवर खेळताना दिसतील. याच बरोबर संघातील खेळाडूमध्ये बदल झालेला आहे. सर्वाधिक बदल हा विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात झाला आहे. त्याच बरोबर राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स संघात नवे खेळाडू दिसतील.

वाचा- विराट कोहलीचे कौतुकास्पद काम; मुंबईकरांना अभिमान वाटेल

आयपीएलचे १४वे सत्र सुरू झाले तेव्हा २९व्या सामन्यापर्यंत सर्व गोष्टी ठिक सुरू होत्या. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लढत झाली आणि सर्व संघ अहमदाबाद आणि दिल्लीला शिफ्ट होत होत्या. तेव्हाच केकेआर संघातील वरुम चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोनाची लागण झाली. यामुळे ३ मे रोजीची लढत स्थगित केली. त्यानंतर चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील चौघांना करोना झाला. यामुळे बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचे ठरवले. आता उर्वरीत ३१ लढती १९ सप्टेंबरपासून सुरू होतील.

गुणतक्त्यात अद्यापही सर्व संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानी आहे. त्या पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्ज, तिसऱ्या स्थानावर आरसीबी तर गतविजेते मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहेत. दिल्ली आणि पंजाब संघांनी प्रत्येकी ८ तर अन्य सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. कोलकाता ७व्या तर हैदराबाद आठव्या स्थानावर आहे.

वाचा- RCB आणि विराटसाठी आनंदाची बातमी; या खेळाडूचे ४६ चेंडूत स्फोटक शतक

दिल्ली कॅपिटल्स- या संघाने ८ सामने खेळले आहेत. पंजाब वगळता अन्य संघासोबत त्यांच्या प्रत्येकी एक लढती झाल्या आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या सत्रात नव्हता. आता तो पुन्हा परतला आहे. संघाचे नेतृत्व पुन्हा अय्यरकडे देणार की पंतकडे नेतृत्व असेल हे अजून स्पष्ट झाले नाही. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ६ पैकी ३ सामन्यात विजय पुरेसा आहे.

चेन्नई सुपर किंग्ज- सात पैकी पाच सामन्यात विजय मिळून चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे आणि आरसीबीचे गुण समान असले तरी चेन्नईचे रनरेट सर्वाधिक आहे. दुसऱ्या सत्रात या संघात कोणताही बदल झालेला नसले. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ७ पैकी ४ सामन्यात विजय पुरेसा आहे.

वाचा- अजिंक्य रहाणेला कधी संघाबाहेर करावे; माजी खेळाडूने सांगितली ही वेळ

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर असलेल्या या संघात सर्वाधिक पाच बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतल्याने संघात अन्य खेळाडूंना स्थान दिले आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ७ पैकी ४ सामन्यात विजय पुरेसा आहे.

मुंबई इंडियन्स- गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर असलेल्या रोहित शर्माच्या मुंबई संघात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईचे ८ गुण असले तरी तिसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबीपेक्षा त्याचे रनरेट चांगले आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ७ पैकी ४ सामन्यात विजय पुरेसा आहे.

वाचा- IPL दुसरे सत्र सुरू होण्याआधी CSKला मोठा सेटबॅक, एक खेळाडू जखमी तर दुसरा….

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्याचे रनरेट देखील वजा आहे. संघात चार बदल झाले आहेत. इंग्लंडचा जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्जर तर ऑस्ट्रेलियाचा टाय हे संघात नसतील. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवण्याचे आव्हान राजस्थानसमोर असेल.

पंजाब किंग्ज- गुणतक्यात सहाव्या स्थानावर असलेल्या पंजाबचे ६ गुण आहेत. त्याचे रनरेट देखील खराभ आहे. दुसऱ्या सत्रात संघातील दोन खेळाडूंनी माघार घेतली आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवावा लागले.

वाचा- मुंबई इंडियन्सचे टेन्शन संपले; रोहितने सुरू केली तयारी, या तारखेला मैदानात उतरणार

कोलकाता नाईट रायडर्स- पहिल्या सत्रात ७ पैकी फक्त २ लढती जिंकलेल्या कोलकाता संघाची अवस्था दुसऱ्या सत्रात आणखी बिघडण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिंन्स यावेळी संघासोबत असणार नाही. त्याच्या जागी टीम साउदीला स्थान दिले आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरला ७ पैक ६ विजय मिळवण्याचे अवघड काम करावे लागले.

सनरायझर्स हैदराबाद- गुणतक्यात सर्वात शेवटच्या स्थानावर असलेल्या या संघाने फक्त एक विजय मिळवला आहे. स्पर्धा सुरू असताना पराभवामुळे कर्णधार बदलण्याची वेळ या संघावर आली होती. आता उर्वरित ७ लढतीत विजय मिळवला तरच प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.

वाचा- रवी शास्त्रीनंतर कोण? सौरव गांगुलीने घेतले या व्यक्तीचे नाव

वरील चित्र पाहता कोलकाता आणि हैदराबाद हे दोन संघ वगळता अंतिम ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी ६ संघात खरी स्पर्धा असणार आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे अव्वल चार संघापैकी किती जणांना धक्का देतात त्यावर गोष्टी ठरतील.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: