Ramayan In MP: ‘विद्यार्थ्यांना रामायण शिकवलं जात असेल तर कुराण आणि बायबल का नाही?’


हायलाइट्स:

  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सरकारचा हस्तक्षेप
  • इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमावरून मध्य प्रदेशात ‘रामायण’
  • काँग्रेस आमदारा आरिफ मसूद यांनी शिवराज सरकारला विचारले प्रश्न

भोपाळ : मध्य प्रदेशात महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘रामचरित मानस’ आणि ‘रामसेतू’ अशा विषयांचा समावेश करण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयानंतर राज्यात एक नवा वाद उभा राहिलाय. काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी शिवराज सिंह चौहान सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेतलाय. ‘विद्यार्थ्यांना रामायण शिकवलं जात असेल तर कुराण आणि बायबल का नाही?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. (Congress MLA from Bhopal Arif Masood)

काँग्रेसचा भाजप सरकारला प्रश्न

राज्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत या विषयांचा समावेश केला जात असेल इतर इतर धर्मांच्या पुस्तकांचाही यात समावेश केला जावा. बायबल, कुराण किंवा ग्रंथांसहीत इतर कोणत्याही धार्मिक पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ नये. हे भारताचं संविधान सांगतं. कोणत्याही खास धर्माला – पंथाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय संवैधानिक मूल्यांविरुद्ध आहे, असंही आरिफ मसूद यांनी म्हटलंय.

जर देशाचं स्वरुप ‘धर्मनिरपेक्ष’ असेल तर रामायणासोबतच कुराण, बायबल आणि गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथांचा अभ्यास करण्यात काय अडचण आहे? असाही सवाल त्यांनी भाजप सरकारला विचारलाय.

Ramayan in MP: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ‘रामायण’ शिकवणार, शिवराज सरकारची घोषणा
Chacha Jaan of BJP ‘अब्बा जान’नंतर ‘चाचा जान’; राकेश टिकैत यांचा ओवैसींवर निशाणा
अभ्यासक्रमावरून ‘रामायण’

मध्य प्रदेशात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रामायण, रामसेतू, महाभारत या विषयांचे धडे दिले जाणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला तसंच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ‘रामायण’ हा विषयदेखील शिकवला जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना ‘रामचरित मानस’शी निगडीत आदर्शांचे धडे दिले जातील. मंत्रोच्चार, योग आणि ध्यान यांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय.

शिक्षण मंत्र्यांचं प्रत्यूत्तर

‘आमचा गौरवाशाली इतिहास विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये कुणी का आक्षेप घ्यावा? रामचरित मानसचा अभ्यास करणं यात काहीही वाईट नाही. स्वेदशी शिक्षण प्रणाली आणि नव्या शिक्षण नीतीसह हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मग याला तुम्ही भगवाकरण म्हणा अथवा आणखी काही…’ असं म्हणत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी विरोधकांना प्रत्यूत्तर दिलंय.

nitin patel still upset : मंत्रिमंडळ बदलावरून गुजरात भाजपमध्ये कलह, नितीन पटेलांनी फडकावले बंडाचे निशाण?
‘काका मला जाऊ द्या’, खो-खो खेळाडूच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवरून आरोपीला बेड्याSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: