डेल्टा प्लस विषाणू रत्नागिरीत सापडलेला नाही, रत्नागिरी जिल्हाधिकारी मिश्रा यांचे स्पष्टीकरण


रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणू सापडलेला नाही. विषाणूमध्ये नेहमीच बदल होत असतात त्यामुळे त्यांचे नमुने तपासणी पाठवले जातात. सतर्कता म्हणून काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. कृपया कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केले.

रत्नागिरी जिल्ह्यातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट पसरला असल्याचे वृत्त काल प्रसारित झाले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात असा कोणताही डेल्टा प्लस व्हेरिंएंट सापडलेला नाही. आमच्याकडून नमुने तपासणीसाठी जात असतात मात्र अजून त्यामध्ये असा व्हेरिएंट सापडल्याची माहिती देण्यात आली नाही.राज्य आरोग्य विभाग अधिकृत प्रकारे नव्या व्हेरिएंट बाबत माहिती प्रसारित करत असतात असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी स्पष्ट केले.

काही भागात वेगळ्या प्रकारचा व्हेरिएंट असू शकतो म्हणून सतर्कता बाळगत संगमेश्वर तालुक्यातील माभळे, धामणी, संगमेश्वर बाजारपेठ, कसबा आणि नावडी या पाच गावात कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून 5200 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 52 जण कोरोनाबाधित सापडले म्हणजे प्रमाण एक टक्का आहे, असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: