‘काका मला जाऊ द्या’, खो-खो खेळाडूच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवरून आरोपीला बेड्या


हायलाइट्स:

  • खो-खो खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या
  • १० सप्टेंबर रोजी हत्या झाली होती हत्या
  • नशेच्या आहारी गेलेल्या आरोपीनं गुन्हा केला कबूल

बिजनौर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात १० सप्टेंबर रोजी २४ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या प्रकरणाचा खुलासा झाला होता. याच प्रकरणात बिजनौर पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. नशेत बुडालेला २६ वर्षीय तरुण शहजाद यानं बलात्काराचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तरुणीची गळा आवळून हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केलाय. घटनेनंतर पाच दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनच्या जवळच्याच एका कॉलनीत राहणाऱ्या खो-खो इंटर युनिव्हर्सिटी खेळाडूची १० सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती.


शेवटचा कॉल झाला रेकॉर्ड

घटना घडली त्या दिवशी दुपारी २.०० वाजल्यादरम्यान आपल्या एका मित्रासोबत मोबाईल फोनवर बोलता बोलता तरुणी घरी परतत होती. याच दरम्यान अचानक मित्राला तरुणीच्या आरोळ्या ऐकू आल्या. ‘काका मला जाऊ द्या, मी मरेल’ अशा विनवण्या ती आरोपीसमोर करत होती. तरुणीचा हा शेवटचा कॉल रेकॉर्ड झाला आणि हाच पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा दुवा सिद्ध झाला.

आरोपीला अटक

खेळाडूच्या मित्रानं याची सूचना तिच्या शेजाऱ्याला देऊन तिचा शोध घेण्यासाठी सांगितलं. शेजाऱ्यानं शोध घेतला असता त्याला रेल्वे रुळाजवळच महिला खेळाडूचा मृतदेह आढळून आला. तिचा मोबाईल मात्र या ठिकाणी पोलिसांना सापडला नव्हता.

यानंतर पोलिसांनी तपास हाती घेतला असता महिला खेळाडूच्या फोनचं लोकेशन शेजारच्याच आदमपूर गावात दाखवत होतं. इथेच पोलिसांनी रात्री २.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी शहजाद उर्फ खादिम याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गांजा आणि चरसची नशा करतो. त्यानं अनेकदा महिला खेळाडूला रेल्वे रुळांवरून जाता-येताना पाहिलं होतं. १० सप्टेंबर रोजी त्याच्याकडे काहीही काम नव्हतं. तेव्हा त्यानं नशा केली आणि तरुणीची वाट पाहत राहिला. महिला खेळाडूचा पाठलाग करत त्यानं तिला गाठलं आणि स्लीपर्सच्या निर्जन स्थळी नेण्याचा प्रयत्न केला. तरुणीनं याला विरोध करताच आरोपी घाबरला आणि त्यानं दुपट्ट्यानं तिचा गळा दाबला.

पोलिसांना घटनास्थळी आरोपीच्या शर्टाचे दोन बटन आणि एक चप्पल आढळून आली होती. आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या घरातून शर्ट, चप्पल आणि एक दोरी जप्त केली. हत्येसोबतच पोलिसांनी बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हाही नोंदवला आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: