Chacha Jaan of BJP ‘अब्बा जान’नंतर ‘चाचा जान’; राकेश टिकैत यांचा ओवैसींवर निशाणा


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
  • ‘अब्बा जान’, ‘चाचा जान’चं राजकारण
  • राकेश टिकैत यांचा असदुद्दीन ओवैसींवर निशाणा

बागपत :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर राजकारणाला जोर चढलाय. याच दरम्यान, ‘अब्बा जान‘ या शब्दावरून राजकारणाला सुरूवात झाल्यानंतर आता ‘चाचा जान’ या शब्दाचाही वापर जाहीर भाषणात करण्यात आलाय. शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ‘चाचा जान’ या शब्दाचा वापर करत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. बागपतमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राकेश टिकैत यांनी ‘असदुद्दीन ओवैसी यांना भाजपचा चाचा जान‘ असं म्हटलंय.

‘भाजपचे चाचा जान असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशात गेलेत. ओवैसींनी भाजपला शिव्या दिल्या तरी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कारण भाजप आणि ओवैसी ही एकच टीम आहे’ असं वक्तव्य यावेळी राकेश टिकैत यांनी केलंय.

शेतकरी आंदोलन : मानवाधिकार आयोगाच्या चार राज्यांना नोटिसा
Yogi Adityanath: महिला, म्हशी आणि बैल… योगी आदित्यनाथांचा व्हिडिओ व्हायरल

निवडणुकी दरम्यान आता ओवैसींकडून धर्माच्या नावावर फोडाफोडीचा प्रयत्न केला जाईल, भाजपलाही हेच हवंय. परंतु, आपल्या मागण्या पूर्ण न करण्यासाठी भाजपला सत्तेाबाहेर काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी अगोदरच घेतलाय, असंही यावेळी टिकैत यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांकडून ‘अब्बा जान’ला सुरुवात

या अगोदर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘अब्बा जान’ या शब्दाचा वापर करत एका वेगळ्या वादाला तोंड फोडलं होतं. विरोधकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करताना, ‘नागरिकांना रेशन मिळतंय का?’ असा प्रश्न विचारत ‘२०१७ पूर्वी हे रेशन त्यांना मिळत होतं का? कारण तेव्हा अब्बा जान म्हणवणारे लोक रेशन खात होते. कुशीनगरचं रेशन नेपाळ आणि बांग्लादेशला जात होतं. पण आज कुणी गरिबांचं रेशन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला नक्कीच तुरुंगात जावं लागेल’, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

rahul gandhi : ‘…तो योगी कसा’, राहुल गांधींचा ‘अब्बा जान’वरून CM आदित्यनाथांवर निशाणा, भाजपचा पलटवार
uddhav thackeray : ‘मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरेंचं हीन दर्जाचं राजकारण’, शिवसेनेच्या ‘जौनपूर पॅटर्न’ला भाजप आमदाराचं प्रत्युत्तर
Modi In Aligarh: अलीगढच्या जाहीर भाषणात पंतप्रधान मोदींना वडिलांच्या मुस्लीम मित्राची आठवणSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: