अमेरिका भारतात लष्करी तळ उभारणार?; परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचे संकेत


वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीनंतर अमेरिकेने दक्षिण आशिया आणि संबंधित क्षेत्राबाबत रणनीतिक धोरणाचा पुर्नआढावा घेण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांविरोधात अमेरिका लष्करी कारवाई सुरू ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी अमेरिका जवळच्या देशांमध्ये आपला लष्करी तळ/ स्टेजिंग एरिया तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर पाकिस्तानबाबतच्या धोरणांना घेऊन अमेरिका पुनर्विचार करत आहे. अशा स्थितीत अमेरिका भारतात लष्करी तळ उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील परराष्ट्र धोरणासंबंधाच्या संसदीय समितीममध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकन यांना याबाबत विचारले असताना त्यांनी अशा प्रकारची शक्यता नाकारली नाही.

तालिबानला मदत करणे पाकिस्तानला महागात पडणार?; अमेरिकेने म्हटले…
परराष्ट्र धोरणाच्या संसदीय समितीच्या बैठकीत ब्लिंकन यांना अमेरिका स्टेजिंग एरिया तयार करण्यासाठी भारताच्या संपर्कात आहे का, असे विचारले होते. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. मात्र, त्याची शक्यताही नाकारली नाही. ब्लिंकन यांनी म्हटले की, भारताशी सध्या चर्चा सुरू असून स्टेजिंग एरिया आणि अशा प्रकारच्या कोणत्याही योजनांबाबत समितीसमोर सार्वजनिकपणे उत्तर देऊ शकत नाही.

पाकिस्तानने गरळ ओकली; भारतात ISIS चे प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याचा आरोप

अमेरिकेचा अफगाणिस्तानला मदतीचा हात; ६४ दशलक्ष डॉलरची घोषणा
रिपब्लिकन खासदार मार्क ग्रीन यांनी उत्तर पश्चिम भारत हा ‘ओव्हर द होराइजन’ मोहिमेसाठी उपयुक्त आहे. दोहा आणि इतर ठिकाणे अफगाणिस्तानपासून दूर आहेत. मार्क ग्रीन हे अमेरिकन संसदीय समितीचे सदस्य आहेत.

याआधी अमेरिकेने पाकिस्तानमध्येही स्टेजिंग भागाची मागणी केली होती. अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याआधी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये लष्करी तळाची मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सीआयएला सीमेपलिकडील दहशतवादविरोधी मोहिमेसाठी आपल्या जमिनीचा वापर करण्याची परवानगी देणार नसल्याचे म्हटले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: