करोना लशीचा बुस्टर डोस हवा की नको? तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे


वॉशिंग्टन: करोना लसीकरणानंतरही संसर्ग वाढत असल्याने अनेक देशांमध्ये लशीचा बुस्टर डोस देण्याबाबत विचार सुरू आहे. काही देशांनी बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. करोना लशीच्या बुस्टर डोसवरून आता तज्ज्ञांमध्ये भिन्न मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.

करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना करोना झाल्यास रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर डेल्टा व्हेरियंटची लागण झाली तरी मृत्यूपासूनही संरक्षण मिळत असल्याने बूस्टर डोस देण्याची गरज नसल्याचे ‘लॅन्सेट’ ने म्हटले आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही अशांना लस दिल्यास अनेक जीव वाचण्यास मदत होईल, असेही लॅन्सेटने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही बूस्टर डोसला विरोध केला आहे. जगातील अनेक गरीब देशांना अजून लस मिळालेली नसताना श्रीमंत देशांनी बूस्टर डोस देणे अन्यायकारक असल्याचे डब्लूएचओने म्हटले आहे. लॅन्सेटने म्हटले आहे, ‘ज्यांना करोनाची लागण होण्याची भीती आहे अशांपर्यंत लस पोचल्यास अनेक जीव वाचविता येतील. बूस्टर डोस देऊनही काही फायदा मिळवला तरी ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांना त्याचा लाभ दिल्यास ते वाया जाणार नाही.’ सध्याच्या स्थितीवरील पाहणी लॅन्सेटने प्रसिद्ध केली असून, डब्लूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन या अहवालाच्या सहलेखिका आहेत.

लसीकरणाला वेग!; जपानमध्ये ५० टक्के लोकसंख्येचे करोना लसीकरण

अमेरिका: शाळा सुरू होताच मुलांना करोनाची लागण!; सात लाखांहून अधिक बाधित

ब्रिटनमध्ये शिफारस

ब्रिटनमधील ५० वर्षांवरील लोकांना आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस देण्याची शिफारस ब्रिटनच्या तज्ज्ञांच्या गटाने मंगळवारी केली आहे. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे. यामुळे प्रतिपिंडे वाढतील. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर पाहिले तर दुसरा डोस लवकर घेतल्यास सर्वांना पुन्हा डोस घेण्याची गरज नाही. दोन डोसमुळे पुरेसे संरक्षण मिळाले आहे. दर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेण्याचीही आवश्यकता नाही, असेही या समितीने म्हटले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: