Coronavirus vaccine करोना लशीचे दोन भिन्न डोस प्रभावी?; WHO ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती


हायलाइट्स:

  • काही देशांमध्ये दोन भिन्न कंपन्यांच्या लशी देण्याबाबत विचार सुरू
  • करोना लशीची परिणामकता आणखी प्रभावी करण्यासाठी, लस तुटवड्यावर मात करण्यासाठी हा मार्ग
  • जागतिक आरोग्य संघटनेकडून एक चांगली माहिती समोर

स्टॉकहोम: करोना लशीची परिणामकता आणखी प्रभावी करण्यासाठी, लस तुटवड्यावर मात करण्यासाठी दोन भिन्न कंपन्यांच्या लशी देण्याबाबत विचार सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने एक चांगली बातमी दिली आहे. दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस दिल्यानंतरही लस प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी लशीची प्रतिक्षा करणाऱ्या देशांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले की, लसीकरण मोहिमेत दुसऱ्या कंपनीचा डोस देता येऊ शकतो. याआधी काही शास्त्रज्ञांनी करोनाच्या वेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची लस देण्याची सूचना केली होती. यामुळे वेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी दीर्घकाळ सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दोन भिन्न लशी दिल्यानंतर दुष्परिणामही जाणवत आहे. जर्मनी, ब्रिटेन आणि स्पेनमधील आकडेवारीनुसार, दोन वेगळ्या कंपन्यांच्या लशी घेणाऱ्यांना ताप, अंगदुखी आणि अन्य साइड इफेक्ट्स दिसून आले.

वाचा:चांगली बातमी ! करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याचा धोका कमी असल्याचा दावा


वाचा: चिंता वाढली! डेल्टानंतर आता ‘या’ नव्या वेरिएंटचा धोका; २९ देशांमध्ये फैलाव

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, दोन वेगवेगळ्या लशी दिल्यामुळे अधिक प्रतिसाद देणारी रोगप्रतिकार शक्ती तयार होत आहे. यामध्ये उच्च स्तरीय अॅण्टीबॉडी आणि पांढऱ्या पेशी तयार होत आहेत. या करोना विषाणूने प्रभावित पेशींचा खात्मा करतात. या दरम्यान काही देशांकडून लसीकरणाला वेग आणण्यासाठी दोन भिन्न लस देण्याबाबतची चाचपणी सुरू आहे. मलेशियामध्ये कोविशिल्ड आणि फायजरची लस देण्याचा विचार सुरू आहे.

वाचा: अमेरिका विकसित करणार करोनाविरोधात औषधी गोळ्या; अब्जावधींची तरतूद


वाचा:
ब्राझीलमध्ये करोना मृतांची संख्या पाच लाखांवर; विरोधकांचे आंदोलन

काही देशांनी आणि औषध कंपन्यांनी करोनाच्या वेरिएंटसाठी बूस्टर शॉटची तयारी सुरू केली आहे. मात्र, याची आवश्यकता भासणार की नाही हे आताच सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: