Hyderabad Rape and Murder: बलात्काराच्या आरोपीला पकडून एन्काऊन्टर करणार, मंत्र्यांचा तोल ढळला


हायलाइट्स:

  • घटनेविषयी बोलताना मंत्र्यांचा तोल ढासळला
  • आरोपीला शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी
  • नागरिकांचा संताप अनावर

हैदराबाद : नुकतीच हैदराबादमध्ये एका अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या घटनेनं हैदराबादसह संपूर्ण देशालाच हादरा दिला. हैदराबादच्या जनतेतून या घटनेविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. आरोपींना लवकरात लवकर धुंडाळून काढून कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होतेय. याच घटनेविषयी बोलताना तेलंगना सरकारच्या एका मंत्र्यांचा तोल ढासळलेला दिसून आला.

मंत्र्यांचा तोल ढळला

तेलंगना सरकारमध्ये कामगार मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे मल्ला रेड्डी यांनी या घटनेची तीव्र निंदा केली. तसंच या घटनेतील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. मात्र यावेळी ‘आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून त्याचा एन्काऊन्टर करणार’ असं एक वक्तव्य मंत्री महोदयांच्या तोंडून निघालं.

हैदराबादच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळालयला हवी. आम्ही त्याला अटक करू आणि एन्काऊन्टर करू, आम्ही आरोपीला सोडणार नाही, असं म्हणताना मंत्रीपदावर असणाऱ्या रेड्डी यांचा तोल ढळलेला दिसून आला.

लवकरच आपण पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरएक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही रेड्डी यांनी दिलं.

Terrorists Arrested: दिल्ली दहशतवादी अटक, चार जणांना १४ दिवसांची पोलीस रिमांड
शेतकरी आंदोलन : मानवाधिकार आयोगाच्या चार राज्यांना नोटिसा
आरोपीवर १० लाखांचं बक्षीस जाहीर

९ सप्टेंबर रोजी हैदराबाद अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. मुलीचा मृतदेह एका बंद घरात आढळून आल्यानंतर या भागात खळबळ उडाली. शेजारीच राहणाऱ्या एका ३० वर्षीय इसमाचा पोलीस या प्रकरणात शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या १५ टीम्स तयार केल्या आहेत. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही आरोपीचा शोध सुरू आहे. हैदराबाद पोलिसांकडून आरोपीला पकडून देणाऱ्यास १० लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलंय.

तेलंगणाचं राजकारणही या प्रकरणामुळे ढवळून निघालंय. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरण समोर आल्यानंतर सोमवारी खासदार रेवाथ रेड्डी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेनंतर हैदराबादसहीत तेलंगणाच्या अनेक भागांत नागरिकांकडून उत्स्फुर्त आंदोलन करण्यात येत आहेत. नागरिकांनी कँडल लाईट मोर्चा काढून न्यायाची मागणी केलीय.

delhi police special cell : दिल्ली, महाराष्ट्र, यूपीत रेकी, ६ दहशतवाद्यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई
uddhav thackeray : ‘मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरेंचं हीन दर्जाचं राजकारण’, शिवसेनेच्या ‘जौनपूर पॅटर्न’ला भाजप आमदाराचं प्रत्युत्तरSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: