फक्त मैदानावरील कामगिरीने नव्हे तर सौंदर्याने घायाळ करणारी भारताची क्रिकेटपटू


मुंबई: भारताच्या पुरुषांच्या संघा प्रमाणेच महिला संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. महिला संघाने इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळला, या संघाचा सात वर्षातील हा पहिला कसोटी सामना ठरला. इंग्लंडविरुद्धची ही एकमेव कसोटी ड्रॉ झाली असली तरी सर्वजण कौतुक करत आहेत ते भारताच्या संघाचे, याचे कारण भारताने फॉलोऑन मिळाल्यानंतर देखील सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले.

वाचा- मग तुमची काय इच्छा मी पुन्हा न्यूड…

इंग्लंडने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. उत्तरादाखल भारताला पहिल्या डावात २३१ धावा करता आल्या त्यानंतर फॉलोऑन मिळाल्यानंतर भारताने सामना ड्रॉ करून दाखवला. या सामन्यात शेफाली वर्माने पहिल्या डावात ९६ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात स्नेह राणाने नाबाद ८० धावा करत पराभव टाळला.

वाचा- IND vs NZ WTC Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या दिवशी काय होणार? वाचा मोठी अपडेट

या सामन्यात भारताच्या एका खेळाडूचे सोशल मीडियावर कौतुक आहे. हे कौतुक फक्त खेळामुळे झाले नाही तर सौंदर्यामुळे होत आहे. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने पहिल्या डावात ७८ धावा केल्या.

स्मृतीचे या सामन्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी स्मृतीला बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा सुंदर असल्याचे म्हटले आहे. पाहा सोशल मीडियावर स्मृतीबद्दल काय म्हणत आहेत.

वाचा- IND vs NZ WTC Final: आणखी १५४ धावा आणि भारताचा विजय पक्का

भारताच्या पहिल्या डावात स्मृतीने शेफाली सोबत पहिल्या विकेसाठी १६७ धावांची भागिदारी केली होती. हा एक विक्रम ठरला आहे. शानदार सुरुवातीनंतर मात्र भारताचा डाव कोसळला. फक्त चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. त्यामुळे भारताला फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात स्मृतीला धावा करण्यात अपयश आले. ती फक्त ८ धावांवर बाद झाली. पण अन्य फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: