तालिबानी दहशतीच्या छायेत हक्कांसाठी महिलांचा लढा


तेल अवीव: अफगाणिस्तानवर तालिबानची पकड मजबूत होत असतानाच आता महिलांचा छळ होत असल्याच्या आणि त्यांना क्रूर वागणूक मिळत असल्याच्या बातम्या धडकत आहेत. तालिबानकडून छळ होत असला तरीही अफगाण महिला विविध शहरांमध्ये मोर्चे काढत आहेत, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत.

‘टाइम्स ऑफ इस्रायल’ वृत्तपत्रातील भूराजकीय तज्ज्ञ फेबियन बौसार्ट यांनी म्हटले आहे, ‘तालिबानने सत्तेत येताना जी आश्वासने दिली होती, त्याच्या विपरित परिस्थिती सध्या दिसते आहे. आम्ही महिलांच्या हक्कांचा आदर करू, त्यांना शिक्षण आणि नोकरी करण्याची परवानगीही देऊ , असे काबूलवर ताबा मिळवण्याआधी तालिबानने म्हटले होते. त्याच्या विपरित वर्तन सध्या सुरू आहे. त्यामुळे महिलांममध्ये संताप पसरला असून, आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी तालिबानशी संघर्ष सुरू केला आहे.’ बौसार्ट हे तेल अवीवमधील ‘सेंटर ऑफ पोलिटिकल अँड फॉरिन अफेअर्स’चे अध्यक्ष आहेत.

अमेरिकेचा अफगाणिस्तानला मदतीचा हात; ६४ दशलक्ष डॉलरची घोषणा

महिलांचे काम फक्त मुलांना जन्म देणे, मंत्रिपदाचा विचार सोडा; तालिबान नेत्याची मुक्ताफळे
गेल्या आ‌ठवड्यात काबूलमध्ये नव्या पुरुषांच्या हंगामी सरकारविरोधात महिलांनी निदर्शने केली. त्या वेळी तालिबान्यांनी चाबूक आणि काठ्यांनी आंदोलक महिलांना मारहाण केली. प्रत्यक्षात तालिबानने शांततामय आंदोलनाला परवानगी दिली होती; परंतु त्यांच्या हस्तकांनी महिला आंदोलकांना मारहाण केली. ‘त्यांनी आम्हाला चाबूक आणि काठ्यांनी मारले आणि घरी जाण्यास फर्मावले. अमिरातीला मान्यता द्या आणि तिचा स्वीकार करा, असा हुकूमही त्यांनी दिला,’ असे एका महिलेने ‘टाइम्स ऑफ इस्राईल’ला सांगितले.

Video तालिबानचा दावा: सालेह यांच्या घरातून मिळाले ४८ कोटी रुपये, सोन्याच्या विटा!
‘अत्यंत कडवे धर्मांध आणि क्रूर असणाऱ्या तालिबानचा आदेश मानण्यास महिलांनी नकार देणे हे अत्यंत धाडसी पाऊल होते. गेल्या वीस वर्षांतील सुधारणा आणि फेरउभारणी त्यांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यांचा विकास झाला आणि त्यांना हक्क उपभोगता आहे. आता हे सर्व पणाला लागले आहे,’ असेही बौसार्ट यांनी म्हटले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: