चीन: डेल्टा वेरिएंटचा कहर; ‘या’ शहरात निर्बंध, महामार्गही वाहतुकीसाठी बंद


बीजिंग: करोना संसर्गाच्या डेल्टा वेरिएंटवर नियंत्रण मिळवल्याचा चीनने केला होता. आता मात्र, पुन्हा एकदा डेल्टा वेरिएंटमुळे चीनची चिंता वाढली आहे. चीनच्या दक्षिणपूर्व प्रांतातील फुजियानमधील शहरात चित्रपटगृहे, व्यायामशाळांसह महामार्गदेखील बंद करण्यात आले आहे. त्याशिवाय या शहरातील नागरिकांना शहराबाहेर न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, फुजियानमधील पुतियान शहरात करोना परिस्थिती गंभीर होत आहे. स्थानिकांमध्ये आणखी करोना बाधित आढळण्याची शक्यता आहे. पुतियान शहराची लोकसंख्या ३.२ दशलक्षच्या घरात आहे. या ठिकाणी करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने तज्ज्ञांचे एक पथक पाठवले आहे. या शहरातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

‘या’ चिमुकल्या देशाची कमाल; दोन वर्षाच्या मुलांचे करोना लसीकरण
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, १० ते १२ सप्टेंबर दरम्यान, फुजियामध्ये करोनाचे ४३ नवीन बाधित आढळले. त्यापैकी ३५ पुतियानमधील आहे. त्याशिवाय पुतियानमध्ये १० सप्टेंबरपासून लक्षणे नसलेली ३२ बाधित आढळली आहेत. चीनमध्ये ताप आणि इतर लक्षणे आढळल्याशिवाय संबंधिताची नोंदणी करोनाबाधितांमध्ये करण्यात येत नाही. प्रशासनाने नागरिकांची करोना चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे आणखी काही बाधित आढळण्याची शक्यता आहे.
करोनाचा संसर्ग फैलावल्याप्रकरणी दोषी; पाच वर्षाचा कारावास
चीनमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत एकूण ९५ हजार २४८ करोनाबाधित आढळली. तर, ४६३६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चीनमध्ये याआधी जियांग्सूमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला होता. दोन आठवड्यापूर्वीच या ठिकाणच्या करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश आले. या ठिकाणी एकही नवीन करोनाबाधित आढळला नाही. मागील महिन्यात करोनाचा संसर्ग फैलावला होता.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: